Mansoor Ali Esakal
मनोरंजन

Mansoor Ali: 'तु सुशांतसारखाच दिसतोय', हृतिकचा स्टंटमॅन मन्सूरने सांगितले, 'त्याच अन् माझं नातं..'

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर सुशांत सारखाचं दिसणारा एक चेहरा व्हायरल होत होता. हा चेहरा होता हृतिक रोशनच्या विक्रम वेधमधील त्याच्या स्टंटमॅन मन्सूर अली खानचा.

त्याचा हा फोटो चाहत्यांना दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण करून देत आहे. खरं तर हृतिक रोशनचा स्टंटमॅन मन्सूरचा चेहरा सुशांतसारखाच दिसतोय . दोघेही अगदी सारखे दिसतात आणि त्यामुळेच मन्सूरची तुलना सुशांतशी केली जात आहे.

त्या फोटोला मिळालेल्या प्रतिसादानं स्टंटमॅन मन्सूर देखील आश्चर्यचकित झाला आहे आणि नुकत्याच झालेल्या संभाषणात त्याच आणि सुशांतच नातं फार जूनं असल्याचं सांगितलं. त्यानं एक दशकापूर्वी सुशांतसोबत प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले आहे.

मन्सूरने एका इग्रंजी वेबसाईटला सांगितले की, त्यानं 2009 मध्ये सुशांतसोबत त्याच मार्शल आर्ट शिक्षकाजवळ प्रशिक्षण घेतलं होतं. तो म्हणाला की, ते अनेकदा भेटायचे आणि एकमेकांशी बोलायचे. त्यावेळी सुशांतने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. आताही लोक त्यांच्यातील शारीरिक साम्य ओळखतात. त्याला पाहिल्यानंतर चाहत्यांना सुशांतची आठवण येते.

दिल्लीत जन्मलेले मन्सूर नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. तो म्हणाला की, त्याचे काका २५ वर्षे अॅक्शन मास्टर होते म्हणून तो चित्रपटात आलो. मन्सूरने खुलासा केला की, सलमान खानचा वॉन्टेड हा त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. एक था टायगर, अग्निपथ, काबिल, बँग बँग! सुपर ३०, वॉर, आणि अगदी अलीकडे विक्रम वेध या चित्रपटातही त्यांन काम केलं आहे.

हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मन्सूरने त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर काही दिवसांनी, तो दिवंगत एसएसआरसारखा दिसतो. त्यामुळं नेटिझन्सनी अचानक तो फोटो व्हायरल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT