pathaan, hrithik roshan on pathaan, hrithik roshan SAKAL
मनोरंजन

Hrithik Roshan on Pathaan: पुर्वी कधी असं पाहीलं नाही.. हृतिक 'पठाण' वर फिदा

भारतभरातील संपूर्ण थेटरमधलं वातावरण पठाणमय झालं आहे.

Devendra Jadhav

शाहरुखचा 'पठाण' आता बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड धडाधड मोडत आहे. भारतभरातील संपूर्ण थेटरमधलं वातावरण पठाणमय झालं आहे. पठाण निमित्ताने शाहरुख खानने 4 वर्षांनंतर हिंदी इंडस्ट्रीत कमबॅक केलंय. शाहरुखच्या पठाण सिनेमाचं अनेक कलाकार तोंड भरून कौतुक करत आहेत. यातच अभिनेता हृतिक रोशनने पठाण चं कौतुक केलंय.

ह्रतिकने नुकताच पठाण पाहिला. पठाण पाहिल्यानंतर हृतिकने त्याच्या भावना सोशल मीडियावर शेयर केल्यात.

हृतिक म्हणाला,"काय जबरदस्त ट्रिप बसली. आकर्षक प्रसंग, पूर्वी कधीही न पाहिलेले व्हिज्युअल, खिळवून ठेवणारी पटकथा, अप्रतिम संगीत, आणि आश्चर्य म्हणजे सिनेमात असणारे ट्विस्ट. सिड तू पुन्हा करून दाखवलेस, आदि तू दाखवलेल्या नावीन्याला आणि धाडसाला सलाम. शाहरुख, दीपिका, जॉन आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन." अशी पोस्ट हृतिकने करून पठाणच कौतुक केलंय.

पठाण निमित्ताने यशराज पिक्चर्स स्वतःचं स्पाय युनिव्हर्स तयार करतंय. हृतिक रोशन सुद्धा या स्पाय युनिव्हर्सचा महत्वाचा भाग आहे. सलमानचा टायगर, हृतिकचा वॉर मधला कबीर आणि आता शाहरुखचा पठाण हे तिघे एकाच स्पाय युनिव्हर्सचे भाग आहेत. त्यामुळे आगामी सलमानच्या टायगर ३ सिनेमात हृतिक सलमान - शाहरुख सोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या तिन्ही सुपरस्टार्सना एकाच सिनेमात बघणं हि चाहत्यांसाठी पर्वणी असेल यात शंका नाही.

पठाण ने एका दिवसात १०० कोटींची कमाई केली. गेल्या वर्षभरात एका दिवसात इतकी मोठी कमाई कोणत्या सिनेमाने केली नव्हती. पठाण मुळे बॉलिवूडला जणू काही नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. पठाण निमित्ताने शाहरुख खानने 4 वर्षांनंतर हिंदी इंडस्ट्रीत कमबॅक केलं. ऍक्शन-थ्रिलर 'पठाण' २५ जानेवारीला संपूर्ण भारतभरात रिलीज झाला. पठाण पाहण्यासाठी शाहरुखचे फॅन्स तुफान गर्दी करत आहेत.

अलीकडे शाहरुख लाल सिंग चड्ढा , रॉकेटरी, ब्रम्हास्त्र अशा सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला.पण प्रमुख भूमिका म्हणून ४ वर्षांनी शाहरुखने पठाण च्या माध्यमातून दमदार कमबॅक केलंय. ऍक्शन-थ्रिलर 'पठाण' २५ जानेवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

वडील समजून दुसऱ्यावरच अंत्यसंस्कार; हत्या करून जाळून फेकलेल्या मृतदेहाचे रहस्य कायम

Jintur accident news: जिंतूरजवळ भीषण अपघातात वसमतचे मामा-भाचा ठार; शहरात शोककळा, बाजार बंद

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

SCROLL FOR NEXT