Hrithik Roshan, Saba Azad Google
मनोरंजन

हृतिक रोशन-सबा आझादच्या नात्याविषयी अखेर मिळालं कन्फर्मेशन

अभिनेता काही दिवसांपासून सबा आझादला डेट करत असल्याची चर्चा सुरु होती.

प्रणाली मोरे

हृतिकनं(Hrithik Roshan) सुझान खानला घटस्फोट दिला खरा,पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात ती दुसरी कुणी आलीच नाही. हो,कंगनासोबतच त्याचं नाव जोडलं गेलं खरं पण ती अफवाच ठरली. त्यांच्यात त्यानंतर पुढे झालेले वाद आपल्या सगळ्यांच्याच कानावर पडले असतील. हृतिक गेली अनेक वर्ष सिंगल होता. ना त्याच्या डेटिंगची चर्चा रंगली, ना लग्नाची खबर कानावर आली. पण अनेक वर्षांनी अखेर हृतिक सबा आझादसोबत हातात हात घालून डिनर डेटला दिसला अन् अखेर त्या चर्चेला सुरुवात झालीच. त्या दोघांना गेले काही दिवसात तीन-चार वेळेला डिनर डेटला पाहिलं गेलं खरं पण त्या दोघांनीही आपल्या नात्याविषयी बोलायला नकार दिला. त्यामुळे ते दोघे एकमेकांना खरंच डेटिंग करीत आहेत का याबाबतीत सगळेच संभ्रमात होते.

पण आता हृतिकचे काका म्हणजे संगीतकार राजेश रोशन यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला अन् चर्चा पुन्हा रंगायला सुरवात झाली. राजेश रोशन यांना हृतिकच्या घरचा लंच डेटचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात संपूर्ण रोशन कुटुंबियांसोबत सबा आझादही दिसत आहे. राजेश रोशन यांनी पोस्टला कॅप्शन देताना लिहिलंय,''कुटुंबासोबत एकत्र लंच करणं तेसुद्धा रविवारी हा एक सुखानुभव''. त्यांनी लंचमध्ये कायकाय पदार्थ आहेत त्याचाही एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात इडली,सांबर आणि इतर बरेच पदार्थ केळीच्या पानावर वाढलेले दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टवर हृतिकनंही म्हटलंय,''हा,हा,हा,तुझं बरोबर आहे काका. तु सोबत असताना तर आणखी धमाल असते''. त्यामुळे सबा आता या फोटोत संपू्र्ण रोशन कुटुंबियांसोबत दिसल्यानं ती हृतिकला खरंच डेट करत आहे यावर चाहत्यांनी मात्र शिक्कामोर्तब केलं आहे आता वाट पहायची ते हृतिकच्या अनाउन्समेंटची.

Hrithik Rosham,Saba Azad

हृतिक २०१९ मध्ये वॉर सिनेमात दिसला होता. हृतिकला दोन मुलंही आहेत. हृदान आणि हृहान ही त्यांची नावं आहेत. हृतिकच्या पू्र्वाश्रमीच्या पत्नीनं सुझान खानं सबाच्या एका पोस्टवर चांगली प्रतिक्रिया दिल्यानंतर त्याचीही चर्चा झालीच होती. सबानं आपल्या परफॉर्मन्सचा एक फोटो शेअर केला होता,त्यावर सुझानंन प्रतिक्रिया दिली होती. सबानंही तिला धन्यवाद करताना खूप छान शब्दात लिहिलं होतं. यावरनं तर कळतंय की हृतिक-सबाच्या नात्याला सर्वांनीच हिरवा झेंडा दाखवला आहे. तेव्हा आता हृतिकही आपलं नातं सर्वांसमोर स्विकारेल ही अपेक्षा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune land deal: मुंढवा जमीन गैर व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना क्लिन चीट, दोषी कोण? अहवालात काय म्हटलं?

नेवासे तालुका हादरला! 'सदस्यांच्या छळाला कंटाळून पदाधिकाऱ्याने जीवन संपवले'; शिक्षण संस्थेच्या सहा सदस्यांवर गुन्हा, चिठ्ठीत काय दडलयं?

Latest Marathi Breaking News Live Update : 'आमच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड सर्वसंमतीने केली जाईल'- भाजप नेते तारकिशोर प्रसाद

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT