hritik roshan and alia bhatt 
मनोरंजन

क्या बात है! हृतीक रोशन आणि आलिया भट यांना आॅस्करचे निमंत्रण..

सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई ः जगातील सर्वात मोठा आणि मानाचा समजल्या जाणाऱ्या आॅस्कर सोहळ्यांचे निमंत्रण हिंदीतील सुपरस्टार हृतीक रोशन आणि अभिनेत्री आलिया भट यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि निर्माते व दिग्दर्शक यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे. 

पुढील वर्षी २५ एप्रिल रोजी हा सोहळा पार पडणार आहे. त्याला देश-विदेशातील अनेक कलाकार तसेच निर्माते व दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत.

आॅस्कर अकादमीने 819 जणांची यादी घोषित केली आहे. यामध्ये ऋतिक आणि आलिया या दोघांच्या नावाचा समावेश आहे.

एकूण निमंत्रितांच्या 819 जणांमध्ये यादीत डॉक्यूमेंटरी चित्रपट निर्माती निष्ठा जैन आणि अमित मधेशिया, डिझायनर नीता लुल्ला, कास्टिंग डायरेक्टर नंदिनी श्रीकांत, व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर विशाल आनंद आणि संदीप कमल यांचाही समावेश आहे. 

आलिया भट्टचा गली बॉय हा चित्रपटही विदेशी भाषा श्रेणीसाठी भारतामार्फत पाठवण्यात आला होता. मात्र या चित्रपटाला नामांकन मिळालं नाही. आता अकादमीने जारी केलेल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये आलियाच्या राजी आणि गली बॉय या चित्रपटाचा उल्लेख करण्यात आला आहे. तर ऋतिक रोशनच्या सुपर 30 आणि जोधा अकबर याचा उल्लेख केला आहे.   

Hritik Roshan and Alia bhatt invited for oscar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT