Hruta Durgule, Prateek Shah Esakal
मनोरंजन

Hruta Durgule: लग्नानंतर प्रतिकनं हृताचं ठेवलं 'निक नेम'.. तिच्याप्रमाणेच क्यूट आहे 'हे' नाव..

हृता दुर्गुळेनं तिच्या 'सर्किट' सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील अनेक खुलासे केले आहेत.

प्रणाली मोरे

Hruta Durgule: 'फुलपाखरु' सिनेमातून मराठी मालिकाविश्वात हृतानं एन्ट्री केली अन् अनेक तरुणांच्या हृदयाची ती धडकन बनली. 'दुर्वा' मालिकेतील तिच्या भूमिकेनं अनेक तरुणींना लढायला शिकवलं तर 'मन उडू उडू झालं' या मालिकेतील तिच्या दिपू या व्यक्तिरेखेनं गुणी मुलगी म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण घालून दिलं.

मालिकाविश्वात रमलेली हृता आता घराघरात ओळखली जाऊ लागली होती..अनेक तरुणांनी तिच्या हवाली आपलं हृद्य केव्हाचंच दिलं होतं अन् तितक्यात हृतानं लग्न करतेय असं जाहीर करत अनेकांना नाराज केलं होतं. पण आपल्या या लाडक्या अभिनेत्रीच्या आनंदात आनंद मानत अनेकांनी तिला भरभरुन आशीर्वाद दिले.(Hruta Durgule reveal her Nick Name Circuitt marathi Movie actress)

आता हृता दुर्गुळे मिसेस.प्रतिक शहा झाली आहे. तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो-व्हिडीओ हृता अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यांच्या रोमॅंटिक लव्हस्टोरीचे साक्षीदार हृताचे चाहतेही आहेत बरं का..अर्थात हृताच्या पोस्टच्या माध्यमातून. आता हृताच्या चाहत्यांना प्रतिकही तितकाच प्रिय वाटतोय. तेव्हा चला जाणून घेऊया प्रतिकनं हृताला नेमकं काय निक नेम दिलंय..जे हृता इतकंच क्यूट आहे.

हृताच्या लग्नानंतर तिचा पती प्रतिक शहानं तिचं नाव 'गोली' असं ठेवलं आहे. हृतानं 'सर्किट' सिनेमाच्या निमित्तानं लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली,''लग्नानंतर प्रतिक 'गोली' म्हणायला लागल्यावर आता सासरी सगळे याच नावानं मला हात मारतात''.

हृता दुर्गुळेला लग्न तिच्या करिअरसाठी चांगलंच मानवलेलं दिसत आहे. लग्नानंतर तिचे एकापाठोपाठ एक असे सिनेमा प्रदर्शित होताना दिसत आहेत. 'टाईमपास' सीरिज, 'अनन्या' अशा दोन अत्यंत वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून भूमिका साकारल्यानंतर हृता आता 'सर्किट' या टोटल वेगळ्या फ्लेवरच्या सिनेमातून आपल्या भेटीस आली आहे. तिचा हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. वैभव तत्त्ववादी सोबत पहिल्यांदाच तिनं स्क्रीन शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Government : "मतमोजणी अचानक पुढे ढकण्याच्या निर्णयाला फडणवीस सरकार जबाबदार", विरोधकांचा गंभीर आरोप

Beed Accident: गेवराईत भीषण अपघात; ट्रॅक्टरची जोरदार धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीत ११.३० पर्यंत १७.५७% मतदान

Akot News : रोजगाराच्या शोधात मजुरांचे स्थलांतर; वीटभट्ट्यावर सर्वाधिक मजूर

Winter Lungs Health: हिवाळ्यात फुफ्फुसांची काळजी कशी घ्याल? डॉक्टरांनी सांगितले निरोगी राहण्याचे सोपे उपाय

SCROLL FOR NEXT