Hum Do Hamare Baarah Islamophobia Controversy: मनोरंजन विश्वाला दोन वर्षांपूर्वी कोरोनानं घेरलं होतं. त्याचा मोठा परिणाम चित्रपट, मालिका क्षेत्रावर झाला होता. त्यात ओटीटीनं मात्र मोठा बिझनेस करत लोकांचे लक्ष आपल्याकडे (bollywood movies) आकर्षित केल्याचे दिसून आले होते. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात विविध विषयांवरील कलाकृती समोर येताना (bollywood actor) दिसत आहे. त्यातील काहींना ट्रोलर्सकडून वाईट प्रतिसाद मिळाला आहे. काहींवर सडकून टीकाही करण्यात आली आहे. अशावेळी हम दो हमारे बारानं तर कहर केल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर भलतेच संवेदनशील असणाऱ्या नेटकऱ्यांनी त्यावरुन मोठा वाद सुरु केला आहे. हम दो हमारे बारा यावर सडकून टीका करण्यात येत आहे.
हम दो हमारे बारा हा एक चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याचा संबंध काही नेटकऱ्यांनी इस्लामशी जोडला आहे. त्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शक यांना जाणीवपूर्वक एका वेगळ्या गोष्टीचा संदेश द्यायचा आहे असे नेटकऱ्यांचे त्या प्रतिक्रियेमध्ये म्हणणे आहे. काहींनी मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न यानिमित्तानं केला जात असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे दिग्दर्शकानं तर पहिल्यांदा हा चित्रपट पाहा मग ठरवा त्यावर बंदी घालायची की नाही? असे सांगितले आहे. हम दो हमारे बाराचे पोस्टर हे इस्लामफोबिक असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
वाढत्या लोकसंख्येवर आधारित हम दो हमारे बाराची निर्मिती करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाची तयारी सुरु आहे. आता त्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्या पोस्टरमध्ये बारा व्यक्तींनी दाटीवाटी करत फोटोंसाठी पोझ दिल्याचे दिसत आहे. फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्याचा प्रयत्न यानिमित्तानं केला जात असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. या चित्रपटामध्ये अन्नु कपूर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्या पोस्टरमध्ये त्यांच्या आजुबाजूला मुली, मुलं, वकील आणि एक प्रेग्नंट मुलगी दिसत आहे.
हम दो हमारे बारा वरुन वाद सुरु झाला असताना या चित्रपटाचे दिग्दर्शक कमल चंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, कोणत्याही एका समाजाला आम्ही लक्ष्य केलं नाही. चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा टीका करणाऱ्यांनी तो अवश्य पाहावा. मग त्यांना कळेल आम्ही नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रसिद्ध पत्रकार राणा आयुबनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तो फोटो शेयर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.