Double XL Teaser esakal
मनोरंजन

Double XL Teaser: 'अंतर्वस्त्र मोठीच हवीत पण...' सोनाक्षी- हुमाचा दणका!

हुमानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन डबल एक्स एल नावाच्या चित्रपटाचा टीझर व्हायरल केला आहे.

युगंधर ताजणे

Huma Qureshi and Sonakshi Sinha Starrer Double XL teaser: महाराणीमध्ये हुमानं जे काम केलं त्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्याच्या पहिल्या सीझनमध्ये देखील तिनं आपण कशाप्रकारची अभिनेत्री आहोत हे दाखवून दिले होते. बॉलीवूडमध्ये अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागलेल्या हुमाचा महाराणी मधील अभिनय प्रेक्षकांना कमालीचा आवडला आहे. आता ती आणि प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या डबल एक्स एलचा टीझर व्हायरल झाला आहे. ज्यातील एका संवादानं हा चित्रपट कसा असणार याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता वाटू लागली आहे.

हुमानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन डबल एक्स एल नावाच्या चित्रपटाचा टीझर व्हायरल केला आहे. या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास ती महिलांविषयीचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांना ज्या गोष्टींवरुन सर्वाधिक ट्रोल केले जाते त्या बॉडी शेमिंगचा मुद्दा या चित्रपटामध्ये प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये राहत असताना सद्यस्थितीतही महिलांना कोणकोणत्या प्रसंगांचा सामना करावा लागतो याची झलक त्या टीझरमध्ये दिसून येते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

14 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सोनाक्षी आणि हुमानं त्याचे जोरदार प्रमोशन सुरु केले आहे. प्रेक्षकांना देखील या चित्रपटाची मोठी उत्सुकता आहे. सतराम रमानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर टी सीरिजच्या वतीनं त्याची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर आता तो प्रेक्षकांसमोर येण्यास तयार आहे.

भारत आणि युकेमध्ये डबल एक्स एलचे शुटिंग करण्यात आले आहे. त्यामध्ये ज्या दोन महिला आहेत त्यातील एक उत्तर प्रदेश तर दुसरी दिल्लीमधील आहे. महिलांकडे पाहताना सुंदरता हाच केवळ एक निकष ठेवून त्यांचे मुल्यमापन केले जाते. केवळ दिसणं महत्वाचं नसणं तुमच्याकडे कोणते गुण आहेत त्यावरुन व्यक्तीची पारख केली जावी असं या चित्रपटातून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''आम्हाला बहीण-भाऊ म्हणू नका'', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या? राजकीय संकेत काय?

Sarfaraz Khan : सर्फराजचे ट्वेंटी-२०त शतक! मुंबई २०० पार... गौतम गंभीर अन् अजित आगरकर यांना 'गार' करणारी अफलातून खेळी

Latest Marathi News Live Update : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Ajit Pawar : 'मिनी भारत' ओझरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीला निवडून द्या: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर आवाहन

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने मैदान गाजवले! अशक्य मॅच खेचून आणली, ११ चेंडूंत ५२ धावांचा पाऊस; टीम इंडियासाठी शुभ संकेत

SCROLL FOR NEXT