मनोरंजन

महिलांबद्दल ताऊजींचा अजब सल्ला; बबिता फोगटच्या 'दंगल' स्टाइल उत्तराचं हुमाकडून कौतुक

'ताऊजींचे विचार समाजासाठी हानिकारक'

स्वाती वेमूल

कुस्तीपटू बबिता फोगटचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलांना घरात राहण्याचा अजब सल्ला देणाऱ्या ताऊजींना बबिता 'दंगल' स्टाइलमध्ये सडेतोड उत्तर देताना या व्हिडीओत दिसतेय. बबिताचा हा व्हिडीओ अभिनेत्री हुमा कुरेशीने शेअर करत तिचं कौतुक केलं आहे.

व्हिडीओत नेमकं काय आहे?

"एक बार जो घर से निकली छोरी तो वह निकली हाथ से, घर की इज्जत घर ही रखो, ताऊ की यह बात सै" (घराबाहेर पडलेली महिला ही हाताबाहेर जाऊ लागते. त्यामुळे घराची अब्रू घरातच ठेवा) असं ताऊजी व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. यावर बबिताने त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. "वाह ताऊ, ये कहके तू ये सोच रहा होगा की तुने बहुत बड़ी बात की है. छोटा मुंह बड़ी बात, लेकिन छोरियां किसी से कम नहीं हैं. छोरी-छोरा दोनों जानते हैं कि समाज का मान कैसा बढ़ाते हैं. ऐसी छोटी सोच तो कोई बालक भी नहीं रखता है. ताऊ तेरी ये सोच मुझे तो समाज के लिए हानिकारक लगती है," (वाह ताऊ, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप मोठं विधान केलं आहे. पण मुली कोणापेक्षा कमी नाहीत. समाजात सन्मान कसा वाढवावा हे मुलामुलींना माहित आहे. एवढे लहान विचार तर एखादा लहान मुलगासुद्धा करत नाही. ताऊ तुमचे हे विचार मला समाजासाठी हानीकारक वाटतात) असं ती म्हणाली.

हुमा कुरेशीने केलं बबिताचं कौतुक

'इंटरनेटवर गेल्या काही दिवसांपासून या ताऊजींचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. मला असं वाटतं की अशा लोकांना अजिबात ओळख मिळाली नाही पाहिजे पण त्यांना सडेतोड उत्तर नक्की मिळालं पाहिजे. बबिता फोगटने त्यांना बेधडक आणि अत्यंत योग्य उत्तर दिलं आहे. बबिताजी, आम्हाला तुमचा अभिमान आहे', अशा शब्दांत हुमाने कौतुक केलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पैसे, रेशनसाठी आईनंच लेकीला विकलं; ७० वर्षीय वृद्धाचा १० वर्षीय चिमुकलीवर २ वर्षांपासून अत्याचार

LPG Price Cut : ‘एलपीजी’च्या किमती कमी झाल्या! , आजपासून गॅस सिलिंडरचे दर बदलले

Latest Marathi News Live Update : मराठी भाषकांवर अन्याय, बेळगाव सीमाभागात आज काळा दिन पाळला जाणार

Dev Uthani Ekadashi 2025: देवउठणी एकादशीला 'या' वस्तू दान केल्यास भगवान विष्णूची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील

रोहित आर्याने १७ मुलांना जमवलं कसं? गोळी झाडली की नाही? एन्काउंटरबाबत मोठे अपडेट समोर

SCROLL FOR NEXT