Double XL Huma Qureshi Sonakshi Sinha. esakal
मनोरंजन

Double XL: हुमाला 20 किलो वजन वाढल्याच दुख: नाही तर 'या' गोष्टीचा आनंद झाला होता...

'डबल एक्सएल' मध्ये राजश्री त्रिवेदीची भूमिका साकारणार...

सकाळ डिजिटल टीम

मुलींच्या वाढत्या वजनामुळे त्यांना अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. याच मुद्दयावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे 'डबल एक्सएल'. या चित्रपटाची प्रदर्शनापुर्वीच जोरदार चर्चा सुरु आहे. यात सर्वात जास्त चर्चा ही सोनाक्षी आणि हुमा यांनी वाढवलेल्या वजनाची होत आहे. या चित्रपटासाठी सोनाक्षीने 17 तर हुमाने तब्बल 20 किलो वजन वाढवलं आहे.

सहसा अभिनेत्री आपल्या शरीरयष्टीवर विशेष लक्ष देतात. यासाठी त्या जिममध्ये घाम गाळतांनाही दिसतात. हुमाने तब्बल 20 किलो वजन वाढवलं आहे.मात्र या चित्रपटासाठी हुमाला 20 किलोनं वजन वाढवायचं होतं.  त्यामुळे तिला वजन वाढवण्यासाठी हव्या त्या सर्व गोष्टी खायला मिळाल्या, या गोष्टीचा पुरेपुर आनंद घेतल्याचं तिनं सांगितलं. त्यामुळे तिने या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्तम तयारी केली होती.लहानपणी तिला 'बिग गर्ल' चिडवलं जायचं याबद्दल ती बोलली. तिने तिच्या शरीरावर परिश्रम घेतले आणि फिगर मेटेंन केले होते.

जेव्हा 'डबल एक्सएल' मधील राजश्री त्रिवेदीच्या भूमिकेसाठी वजन वाढवण्याची वेळ आली तेव्हा तिला हे सर्व परत करावं लागणार होतं. त्यामुळे तिच्या सोबतच्या लोकांनी तिला ही भूमिका निवडताना सावध राहण्याचा सल्ला दिला. त्याच बरोबर हा चित्रपट तुझ्या करियरचा शेवटचा चित्रपट ठरु शकतो असेही सांगितले. मात्र तिच्या भूमिकेने तिने पुन्हा स्वत:ला सिद्ध केले आहे.या चित्रपटाचे शूटिंग हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या अनुभवांपैकी एक आहे आणि त्यामुळेच तिचा स्वत:वर अधिक मजबूत आणि आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे तिने सांगितले.

'डबल एक्सएल' 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या वर्षी सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, झहीर इक्बाल आणि महत राघवेंद्र यांच्या प्रमूख भूमिकेत आहेत. सतराम रमाणी दिग्दर्शित हा एक स्लाईस ऑफ लाईफ कॉमेडी आहे ज्यात आयुष्य जगतांना तुमच्या शरीराचा आकार तुमच्या जगण्यावर परिणाम करु शकत नाही असा संदेश देतो आणि बॉडीशेमिंगवर भाष्य करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT