Romeo and Juiliet actors olivia hussey leonard whiting sued film director for 500 million dollor for sexual harassment and abuse case Google
मनोरंजन

Hollywood: रोमिओ-ज्युलिएटने तरुणपणातील लैंगिक अत्याचाराचा म्हातारपणात केला खुलासा..

रोमियो एन्ड ज्युलिएट सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखा साकारणारे ओलिविया हसी आणि लियोनार्ड व्हिटिंग यांनी सिनेमाच्या निर्माता-दिग्दर्शकावर आरोप केले आहेत.

प्रणाली मोरे

Romeo and Juiliet: खऱ्या प्रेमासाठी ओळखले जाणारे 'रोमियो अँड ज्युलिएट' तर सगळ्यांनाच माहिती आहेत. 1968 मध्ये याच खऱ्या प्रेमावर आधारित 'रोमियो अँड ज्युलिएट' चित्रपट बनवला गेला होता पण या चित्रपटातील कलाकारांनी आता अनेक वर्षांनी मोठे खुलासे केले आहेत. आपल्याला फसवून न्यूड सीन्स शूट करुन घेतले गेले आणि लैंगिक अत्याचार देखील केले गेले असे आरोप या कलाकारांनी चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँको झेफिरेली आणि चित्रपट निर्माता पॅरामाउंट पिक्चर्सवर केले आहेत. ( Romeo and Juiliet actors olivia hussey leonard whiting sued film director for 500 million dollor for sexual harassment and abuse case)

'रोमिओ आणि ज्युलिएट' या व्यक्तिरेखांवर अनेक चित्रपट आतापर्यंत बनवले गेले आहेत. हॉलिवूड चित्रपट निर्माते दिग्दर्शक फ्रँको झेफिरेली आणि पॅरामाउंट पिक्चर्स यांनी 1968 साली 'रोमिओ अँड ज्युलिएट' चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात रोमिओ आणि ज्युलिएटच्या भूमिकेसाठी दोन तरुण कलाकारांना संधी मिळाली होती. हा चित्रपट त्यावेळी खूप यशस्वी ठरला होता. पण दिग्दर्शकाने बालवयात कलाकारांकडून इंटिमेट सीन शुट करून घेत त्यांची फसवणूक केली आहे असा आरोप अनेक वर्षांनी आता होत आहे.

रोमियो अँड ज्युलिएट' चित्रपटातील मुख्य पात्र ऑलिव्हिया हसी आणि लिओनार्ड व्हाईटिंग यांची फसवणूक करुन त्यांच्याकडून न्यूड सीन्स शूट करून घेतले होते. त्यावेळी दोघेही १५ आणि १६ वर्षांचे होते, चित्रपटात एक बेडरूम सिन होता. त्या‌ सिनमध्ये त्यांना अंडरगारमेंट घालण्यास सांगितले होते, मात्र शूटिंगच्या दिवशी सकाळी अचानक निर्णय बदलत झेफिरेलीने रोमिओची भूमिका करणाऱ्या व्हाईटिंगला आणि ज्युलिएटची भूमिका करणाऱ्या ऑलिव्हियाला सांगितले की त्यांच्या अंगावर फक्त मेकअप केला जाईल आणि कॅमेरा असा असेल की त्यांचे नग्न शरीर दिसणार नाही.

तथापि, असे आश्वासन मिळाल्यानंतरही, दोघांना न्यूड अवस्थेत कॅमेऱ्यानं चित्रित केलं गेलं. हे सगळं त्यांच्या बालवयात केलं गेलं होतं आणि त्यावेळच्या कॅलिफोर्नियामधील प्रस्थापित कायद्याच्या विरोधात ते घडलं होतं.

आता दोन्ही कलाकारांचे वय जवळपास 71 आणि 72 असं आहे. म्हणजे हे दोन्ही कलाकार आता वृद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँको झेफिरेली यांचे २०१९ साली निधन झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : आदिवासी आक्रमक- पोलिस स्टेशनवर दगडफेक

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Sharad Pawar : पूरग्रस्तांसाठीच्या नुकसानभरपाईचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे; शरद पवार यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT