atul kulkarni news of retirement 
मनोरंजन

चर्चा अतुल कुलकर्णीच्या 'रिटायरमेंट'ची; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयासाठी प्रसिध्द असणा-या अभिनेता अतुल कुलकर्णी यांचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे. सोशल मीडियावरही ते अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग सक्रिय असतो. समाजात घडणा-या घडामोंडीवर बारकाईने लक्ष ठेवून असणारे अतुल कुलकर्णी ठाम भूमिका घेणारे अभिनेते आहेत. त्यांचे विचार बारकाईनं ऐकणारा आणि त्याचा गांभीर्यानं विचार करणारा एक खास वर्ग आहे. त्यामुळे ते चर्चेत असणारे कलावंत आहेत. असे सांगता येईल.

मी आता रिटायर होत आहे. अशा आशयाची एक पोस्ट अतुल यांनी सोशल मीडियावर शेयर केली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या क्वेस्ट या एनजीओतून मुक्त होत असल्याचे सांगितले आहे. शिक्षण क्षेत्रातील बदल, त्यातील महत्वाच्या गोष्टींवर विचार करणारी संस्था म्हणून क्वेस्टचे नाव घेतले जाते. अतुल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, देशातले प्रख्यात शिक्षणतज्ञ निलेश निमकर यांनी सुचवलेले पर्याय आणि केलेलं मार्गदर्शन यामुळे संस्थेला शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे काम करता आले. आमची सुरुवात फार छोटी होती. एका छोट्याशा ऑफिसमध्ये आम्ही सुरुवात केली. पुढे त्याचा पसारा वाढला. वाडा जिल्हयातील सोनाळा गावी सुरु केलेलं ऑफिस दुर्गम भागात होते.

आज आम्ही तब्बल दोन लाख साठ हजार मुलांपर्यत पोहोचलो आहोत. केवळ विद्यार्थीच नाही तर ९ हजार शिक्षक आणि ५७०० शाळांमध्ये केलेलं काम मोठं आहे. त्याच्या अनेक आठवणी आणि प्रसंग आहेत. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये आम्ही काम केले. दरवर्षी हा आकडा वाढत होता. हे सगळे कमीत कमी वेळेत शक्य झाले. एका सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचा घेतलेला ध्यास आणि त्यासाठी एनजीओशी १४ वर्षे जोडले जाणे हे सगळे अविस्मरणीय आहे. यासगळ्या प्रवासात आम्हाला आमचे मित्र, देणगीदार, यांचे मोठे सहकार्य लाभले. क्वेस्ट संस्थेचा मला अध्यक्ष होता आले याचेही समाधान आहे. त्यातून मोठे काम करता आले. 

यावेळी अतुल यांनी आपल्या पोस्टमध्ये एक The Theory of Sigmoid Curve चे उदाहरण दिले आहे. ते म्हणाले, जेव्हा सर्व काही सुरळीत सुरु असते. आणि तुम्ही खेळात सर्वोच्च स्थानी पोहचलेला असता अशावेळी आपण बाहेर पडण्याचा विचार करायचा असतो. यशाचा चढता आलेख पाहिल्यानंतर पुन्हा नव्यानं दुसरा आलेख तयार करण्याची गरज असते. याप्रकारच्या थिएरीवर माझा विश्वास आहे. मी आश्रम नावाच्या थिएरीवरही विश्वास ठेवतो. सध्या मी वानप्रस्थकडे झुकलो असल्यानं त्यामुळे निवृत्तीचं पाऊल मला उचलावे लागत असल्याचंही कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या पोस्टला चाहत्यांनी, मित्रांनी मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा आणि कमेंटही दिल्या आहेत. 
 
 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचा नवा उच्चांक ! आठवड्यात ७ हजार रुपयांनी महागले, चांदीतही ३७००० हजारांची वाढ; जाणून घ्या आजचा ताजा भाव

U19 IND vs SA: १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला टीम इंडियाचा कर्णधार; द. आफ्रिकेत नेतृत्व करताना घडवणार इतिहास

Year End Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला मोठं फळ देणारा योग! कल्याणासाठी ‘या’ वस्तू दान करायला विसरू नका

Ashes Series : क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओंची झोप उडाली; दोन दिवसांत सामना संपल्यामुळे नुकसानीची भीती

Pune Municipal Election : मोठी बातमी! आमदार, खासदारांच्या मुलांचे पत्ते कट; शनिवारी रात्री आले आदेश

SCROLL FOR NEXT