JONNY NASH 
मनोरंजन

अमेरिकन गायक जॉनी नॅश यांच निधन, वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अमेरिकेचे प्रसिद्ध गायक जॉनी नॅश यांच निधन झालं आहे. जॉनी ८० वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या जबरदस्त गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. मंगळवारी जॉनी यांनी शेवटचा श्वास घेतला. याबाबतची माहिती त्यांच्या मुलाने मिडियाला दिली. जॉनी नॅश यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि कलाकारांमध्ये दुःखाचं वातावरण आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी श्रद्धांजली दिली जात आहे.

जॉनी यांच्या मुलाने मिडियाशी बोलताना सांगितलं की 'ते जगातले सगळ्यात उत्तम वडिल होते. ते एक चांगले वडिल असण्यासोबतंच एक कौटुंबिक व्यक्ती देखील होती. ते लोकांवर खूप प्रेम करायचे. त्यांचे चाहते त्यांना नेहमीच मिस करतील. कुटुंबच त्यांचं जग होतं. जॉनी १९५० पासून ते १९८६ पर्यंत खूप सक्रिय होते. ३६ वर्षांच्या त्यांच्या करिअरमध्ये जॉनी यांनी अनेक उत्तम गाण्यांना त्यांचा आवाज दिला तसंच अनेक पुरस्कार देखील मिळवले.

१९७० मध्ये जॉनी यांनी 'आय कॅन सी क्लिअरली नाऊ'ने सगळ्यांची मनं जिंकली होती. ते त्यांच्या करिअरमधील सगळ्यात हिट गाणं ठरलं. महिनाभर हे गाणं टॉप लिस्टमध्ये होतं. जॉनी यांनी त्यांच्या करिअरमधील शेवटचं गाणं १९८६ मध्ये गायलं होतं. 

आश्चर्याची बाब म्हणचे काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अमेरिकन गिटारिस्ट एडी वॅन हेलेन यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं होतं. एडी वॅन हेलेन यांचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं. या दोन्ही कलाकारांचं जग सोडून जाणं ही सगळ्यांसाठीच दुःखाची बाब ठरली.   

i can see now singer johnny nash died at the age of 80  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Global Sperm Count Decline : जगभरात पुरुषांचा स्पर्म काऊंट होतोय कमी, भारतात आहे 'ही' स्थिती, संशोधनात काय आले समोर?

Video Viral: ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेटपटू अचानक कॅबमध्ये बसल्यावर ड्रायव्हर शॉक; कॅमेऱ्यात रिअॅक्शन कैद

SBI Bank Theft : धारूर तालुक्यातील एसबीआय बँकेत दिवसाढवळ्या चोरी; शेतकऱ्याचे पन्नास हजार रुपये लहान मुलाने लंपास केले

अबब..! सोलापूर शहर पोलिसांनी शोधले चोरीला गेलेले व हरविलेले तब्बल ४६ लाखांचे मोबाईल; ‘या’ पोर्टलवर भरा माहिती, मिळेल तुमचा हरविलेला मोबाईल

Latest Marathi News Live Update : सातारा महिला डॉक्टर प्रकरणातील दोषींना कठोर शासन व्हावे, धनंजय मुंडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT