Priyanka Chopra-Jonas,Nick Jonas Google
मनोरंजन

प्रियंकासोबत लग्न करताना निक जोनसला 'या' गोष्टीची वाटत होती भीती

एका मुलाखतीमध्ये बोलून बसला अनं मग त्याला फॅन्स म्हणाले...

प्रणाली मोरे

प्रियंका चोप्राचं(Priyanka Chopra) निक जोनसशी(Nick Jonas) लग्न झालं आणि अमेरिकेचा हा सिंगर भारताचा जावई झाला. बरं आज लग्नाच्या तीन वर्षांनंतरही या दोघांच्या नात्यामधला गोडवा तसूभरही कमी झालेला दिसत नाही बरं का. मग अगदी दोघांचं नवीन घर असो,कुठलंही अॅवॉर्ड फंक्शन असो,पार्टीज असोत,शुटिंग असो की कुठल्याही मुलाखती असोत दोघेही एकमेकांसोबत हजर असतात आणि नसले तरी त्यांच्या तोंडून एकमेकांविषयी भरभरून बोललं जातं. दोघेही शुटिंगच्या निमित्ताने लांब असले तरी लंडन-अमेरिका असा प्रवास फक्त भेटण्यासाठी करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या कामाचा आदर ते नेहमीच मनापासून करताना दिसतात.

निक आणि प्रियंका यांच्या वयात जवळपास नऊ-दहा वर्षाचं अंतर असलं तरी ते त्यांच्या वागण्यातनं दिसून येत नाही. ना प्रियंका मोठी असल्यामुळे निकला कधी बंधनात ठेवताना दिसते ना निक लहान असल्यामुळे बेफ्रिक्रीपणात तिच्यासोबत वागताना दिसतो. ''निक जरी वयानं लहान असला तरी तो कधीकधी माझ्यापेक्षा जबाबदारीने वागतो'',असं एकदा प्रियंकाच एका मुलाखतीत बोलली होती. नुकतच निक त्याच्या एका मुलाखतीत असं काही बोलून बसला आहे की यावरून कळून येतं की त्याचं त्याच्या बायकोवर किती प्रेम आहे. याच मुलाखतीत त्यानं कबूल केलंय की लग्नाआधी त्याच्या मनात प्रियंकासोबतच्या नात्याला घेऊन एक भीती होती.

'जोनस ब्रदर्स' या मिनी सिरीजच्या पहिल्याच भागात निकनं म्हटलंय की, ''प्रियंकासोबत लग्न करताना मला वाटत होतं की मी लग्न तर करतोय पण मी एक चांगला नवरा बनू शकेन की नाही. माझ्या नात्याला न्याय देऊ शकेन की नाही. मला असंही वाटतं की मी एक चांगला भाऊ,मुलगा बनू शकेन ना. माझं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे आणि ते सर्व माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत''. निकने ह्या मुलाखतीचा भाग इन्स्टाग्रामवर शेअर केला अनं त्याच्या फॅन्सनी खूप चांगल्या कमेंट्स केल्या आहेत. फॅन्स त्याला म्हणाले आहेत,'तू सिद्ध केलं आहेस की तू एक चांगला नवरा आहेस'. कुणी म्हणालंय की,'प्रियंकाला तुझ्यासारखा नवरा मिळाला आहे त्यामुळे ती खूप लकी आहे'. नुकताच निक आणि प्रियंकाने त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस लंडनमध्ये सेलिब्रेट केला. कॅंडल लाइट डिनर करून या दोघांनी या दिवसाला स्पेशल बनवल्याचं त्यांनी शेअर केलेल्या फोटोजमधून दिसत होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT