'I love you' Zaheer Iqbal makes relationship with Sonakshi Sinha official with belated birthday post Google
मनोरंजन

सोनाक्षीला I Love You म्हणत अभिनेत्यानं दिली प्रेमाची कबुली,जहीर इकबाल कोण?

बॉलीवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा आणि नोटबूक अभिनेता जहीर इकबाल आपल्या रिलेशनशीप स्टेटसवरनं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.

प्रणाली मोरे

बॉलीवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha) आणि 'नोटबूक' अभिनेता जहीर इकबाल(Zaheer Iqbal) आपल्या रिलेशनशीप स्टेटसवरनं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दोघांच्या डेटिंगच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून कानावर पडतायत हे देखील तितकंच खरं आहे. सोनाक्षी आणि जहीरनं मात्र आपल्या नात्यावर बोलणं अद्याप टाळलं आहे. पण अभिनेत्यानं आता आपल्या नवीन पोस्टमध्ये सोनाक्षी सिन्हाविषयीच्या आपल्या प्रेमाविषयी अन् तिच्यासोबत असलेल्या नात्यासंदर्भात हिंट देण्याचा प्रयत्न केला आहे.

सोनाक्षी सिन्हाचा २ जून रोजी वाढदिवस होता. तेव्हा जहीर इकबाल कसा काय मागे राहिल तिला शुभेच्छा देण्यापासून. एका जेंटलमॅन सारखं त्यानं सोनाक्षी साठी स्पेशल बर्थ डे पोस्ट शेअर केली आहे. जहीरनं थोडी उशिरा पोस्ट शेअर केली,परंतु जहिरनं पोस्टला जे प्रेमानं भारलेलं कॅप्शन दिलं होतं त्यानं मात्र अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर हसू उमललं असणार हे १०० टक्के.

जहीर इकबालनं काही तास आधी सोनाक्षी सोबत मजा-मस्ती करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ एकदम प्लेन शूट केला गेला आहे. सोनाक्षी बर्गरचा आस्वाद घेताना दिसत आहे. पण जहीर तिला काहीतरी विनोद करुन हसवताना दिसत आहे. दोघांचा तो व्हिडीओ पाहिला की त्यांच्यातील केमिस्ट्री आणि स्ट्रॉंग बॉन्डिंगचा अंदाज आपल्याला येईलच. सोनाक्षीच्या या हटके व्हिडीओला शेअर करीत जहीर इकबालनं लिहिलं आहे,''हॅप्पी बर्थडे Sonzzz. आय लव्ह यू. तुला खूप सारं आवडीचं फूड,फाइ्टस आणि लाफ्टर''.

जहीर इकबालनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर आणि कॅप्शनवर चाहते मात्र भरभरुन प्रेमाचा वर्षाव लाइक्सच्या माध्यमातून करताना दिसत आहेत. चाहत्यांनी देखील दोघांमधील केमिस्ट्री आणि स्वीट बॉन्डिंगला 'क्यूट' म्हटलं आहे. बोललं जात आहे की, सोनाक्षी सिन्हासाठी केलेल्या पोस्टमध्ये जहीरनं 'आय लव्ह यू' म्हणत एका अर्थानं तिच्याविषयी असलेल्या प्रेमाची कबुलीच दिली आहे. आणि आपल्या रिलेशनशीपला देखील कन्फर्म केलं आहे.

जहीर इकबालचा जन्म १० डिसेंबर १९८८ ला मुंबईत श्रीमंत कुटुंबात झाला आहे. त्याच्या कुटुंबाचा दागिन्यांचा व्यापार आहे. सिनेइंडस्ट्रीशी जहीरच्या कुटुंबाचा तसा फारसा संबंध नाही. पण सलमान खान आणि जहीरचे वडील इकबाल रत्नासी हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यामुळे बॉलीवूडशी तसं खास नात जहीरच्या कुटुंबाचं आहे असं म्हणायटला हरकत नाही. बहिण अर्पिताच्या लग्नात सलमान जहीरला भेटला,त्याला त्याचा अभिनेत्याचे गुण दिसले अन् त्यानं जहीर नोटबूक सिनेमातून लॉन्च केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT