ICC World Cup 2023  esakal
मनोरंजन

CWC 2023 : भारतीय टीममध्ये कोण आहे 'चुलबूल पांडे' अन् 'बजरंगी भाईजान'? सलमान खाननं कुणाचं घेतलं नाव

आयसीसी वर्ल्ड कप २०२३ मध्ये भारतानं आता सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे.

युगंधर ताजणे

ICC World Cup 2023 : आयसीसी वर्ल्ड कप २०२३ मध्ये भारतानं आता सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे तमाम भारतीय प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या उत्साहाला उधाणही आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यत भारताने जी विक्रमी कामगिरी केली आहे त्याचे कौतुक होत आहे. ICC world cup 2023 Salman khan Tiger 3 Promotion

भारताच्या आतापर्यंतच्या वर्ल्ड कपच्या सामन्यातील इतिहासाकडे पाहिल्यास त्यांनी यावेळी अधिक परिणामकारकपणे आपली छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. सोशल मीडियातून त्याचे कौतुक होत असून आता बॉलीवूडच्या भाईजानला देखील भारतीय संघाची भुरळ पडल्याचे दिसून आले आहे. त्यांनी आपल्या हटक्या अंदाजात भारतीय संघाची प्रशंसा तर केलीच याशिवाय दोन खेळाडूंना आपल्या चित्रपटातील त्या दोन व्यक्तींची नावं देऊन गौरविले आहे.

सलमान भारतीय संघाचा सामना पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यानं दिलेली प्रतिक्रिया ही चर्चेत आली आहे. यावेळी त्याला कोणत्या दोन खेळाडूंविषयी बोलायला आवडेल असे विचारण्यात आले होते. त्या प्रश्नावर उत्तर देताना सलमान ज्या दोन खेळाडुंची नावं घेतली त्याची चर्चा होत आहे. सध्या भाईजान त्याच्या आगामी टायगर ३ चे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. त्यानिमित्तानं आयोजित काही मुलाखतींमधून तो वेगवेगळ्या गोष्टींवर बोलताना दिसतो आङे.

सलमाननं स्टार स्पोर्टसशी बातचीत केली आहे. यावेळी त्यानं दोन भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सलमान तुझ्यामते टीम इंडियामधील दबंग चुलबूल पांडे अन् बजरंगी भाईजान कोण आहे असे तुला वाटते, असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यानं दबंग चुलबूल पांडे म्हणून विराटचे नाव घेतले आणि रोहित शर्माचा बजरंगी भाईजान म्हणून उल्लेख केला.

सलमान म्हणतो, विराट हा फिजिकली खूपच फिट दिसतो. याशिवाय तो मानसिकदृष्ट्या देखील खंबीर आहे. तो त्याच्या ध्येयाप्रती खूपच समर्पित आहेत. मला त्याचे व्यक्तिमत्व आवडते. त्यामुळे मी त्याला दबंग चुलबूल पांडे असे म्हणतो. दुसरीकडे कॅप्टन रोहित शर्माला बजरंगी भाईजान व्यक्तिरेखेशी जवळीक साधणार आहे. त्याचे कारण तो शांत, संयमित वर्तन असणारा आहे. वेगवेगळ्या लोकांना एकत्रित आणणारं असं त्याचं नेतृत्व आहे.

सलमानच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास तो येत्या १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून तो मनीष शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी टायगर ३ च्या ट्रेलरची जोरदार चर्चा झाली होती. त्याला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद मिळाला होता. कतरिना कैफ अन इम्रान हाश्मी यांच्या त्यात मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT