IFFM 2022- Ranveer singh won a Best Actor Award for '83'.
IFFM 2022- Ranveer singh won a Best Actor Award for '83'. Google
मनोरंजन

Ranveer Singh: ऑस्ट्रेलियात रणवीर सिंगच्या नावाचा जयजयकार, काय आहे कारण?

प्रणाली मोरे

Ranveer Singh: गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंग(Ranveer singh) त्याच्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आला होता. त्याच्या घरी अगदी पोलिसांची नोटिसही यासंदर्भात गेली होती. पण आता अचानक वादात सापडलेल्या रणवीर सिंगच्या नावाचा जयजयकार झाल्याची बातमी कानावर पडली आहे. त्याचा मोठा सत्कार करण्यात आला आहे तो देखील ऑस्ट्रेलियात. काय आहे बरं कारण? चला,जाणून घेऊया.

इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM 2022)मधील विजेत्यांची घोषणा झालेली आहे. ऑस्ट्रेलियात दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात भारतातील महत्त्वाचे नावाजलेले,गाजलेले सिनेमे,टी.व्ही शोज आणि वेब सिरीजचं स्क्रीनिंग केलं जातं, आणि त्यांना सम्मानीतही केलं जातं. या फेस्टिव्हलमध्ये रणवीर सिंग(Ranveer Singh) आणि शेफाली शाहला उत्कृष्ट अभिनेता आणि उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे.

या फेस्टिव्हलचं मुख्य आकर्षण ठरतं ते अॅवॉर्ड नाइट्स, जिथे भारतीय सिनेमे आणि मागील वर्षीच्या ओटीटीवर रिलीज झालेल्या वेबसिरीजमधील उत्कृष्ट कलाकारांना पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात येतं. रविवारी १४ ऑगस्ट रोजी आयोजित केल्या गेलेल्या या सोहळ्यात अनेक कलाकारांचा पुरस्कार देऊन सम्मान करण्यात आला.(IFFM 2022- Ranveer singh won a Best Actor Award for '83'.

13 वा IFFM फेस्टिव्हल १२ ऑगस्टला सुरु झाला होता. हा सोहळा ३० ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे. रविवारी १४ ऑगस्टला फेस्टिव्हल मधील मुख्य आकर्षण असलेल्या अॅवॉर्ड नाइट्सचे आयोजन केले गेले. ऋत्विक धनजियानीने हा सोहळा होस्ट केला होता. या सोहळ्यात कबीर खानचा स्पोर्ट ड्रामा '83' ला आणि अभिनेता रणवीर सिंगला तसंच 'मुंबई डायरीज २६' आणि 'जलसा' सिनेमाला पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे. जय भीम ,गंगूबाई काठियावाडी या दोन्ही सिनेमांना पुरस्कार सोहळ्याता नामांकने मिळाली होती. पण हे दोन्ही सिनेमे पुरस्कारावर आपलं नाव कोरण्यात अपयशी ठरले आहेत.

मेलबर्न २०२२ च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल विजेत्यांची पूर्ण लिस्ट पहा-

उत्कृष्ट सिनेमा- 83

उत्कृष्ट दिग्दर्शक- शूजीत सरकार(सरदार उधम) आणि अपर्णा सेन( द रेपिस्ट)

उत्कृष्ट अभिनेता- रणवीर सिंग(83)

उत्कृष्ट अभिनेत्री- शेफाली शहा (जलसा)

उत्कृष्ट सीरिज- मुंबई डायरीज 26/11

उत्कृष्ट अभिनेता(सीरिज)- मोहित रैना( मुंबई डायरीज 26/11)

उत्कृष्ट अभिनेत्री(सीरिज)-साक्षी तन्वर(माई)

उत्कृष्ट सिनेमा- जग्गी

लाइफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड- कपिल देव

रणवीर सिंगला '83' मधील भूमिकेसाठी पुरस्कार देऊन सम्मानीत करण्यात आलं. हा सिनेमा २४ डिसेंबर २०२१ मध्ये सिनेमागृहात रिलीज झाला. परंतु त्यावेळी कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव असल्या कारणानं थिएटरमध्ये सिनेमा फारसा चालला नाही. पण IFFM 2022 मध्ये सिनेमातील भूमिकेबदद्दल पुरस्कार मिळाला याचा आनंद रणवीर सिंगनं व्यक्त केला. त्यानं यासाठी ज्युरी सदस्यांचे आभार मानले आहेत.

रणवीरनं आपल्याला '83' साठी मिळालेला सम्मान कपिल देव यांच्या विश्व कप विजेत्या टीमला समर्पित केला आहे, रणवीर सिंग व्यतिरिक्त या सिनेमात हार्डी संधू, ताहिर राज भसीन, साकिब सलीम, एम्मी विर्क, दीपिका पदूकोण,पंकज त्रिपाठी असे कलाकार होते. रणवीरच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच रोहित शेट्टीच्या 'सर्कस' सिनेमात आणि करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांचा ए़िडिटेड व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आमदाराच्या 'पीए'ला अटक

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT