IIFA 2022 Show news esakal
मनोरंजन

IIFA 2022: गाढवावर बसून आयफा शो मध्ये दोन बॉलीवूड सेलिब्रेटींची हजेरी

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन (Tv Entertainment) विश्वातील प्रसिद्ध अशा आयफा अॅवॉर्डसची चर्चा आहे.

युगंधर ताजणे

IIFA 2022 News: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन (Tv Entertainment) विश्वातील प्रसिद्ध अशा आयफा अॅवॉर्डसची चर्चा आहे. त्यातील रंगत ज्या सेलिब्रेटींनी वाढवली त्या सेलिब्रेटींचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. आयफा हा बॉलीवूडमधील सर्वाधिक प्रसिद्ध असा पुरस्कार आहे. इंटरनॅशनल (Social media viral news) इंडियन फिल्म अॅकडमी अॅवॉर्ड (आयफा) आपल्याला मिळावा अशी अनेक कलाकारांची इच्छा असते. अशावेळी ज्या नवोदित कलाकारांना या पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपला आनंद पोस्ट करुन व्यक्त केला आहे. यासगळ्यात एका गंमतीशीर व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. (Shahid kapoor farhan akhtar news)

आयफानं त्यांच्या इंस्टा अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामधील (IIFA Entertainment News) बॉलीवूडमधील दोन प्रसिद्ध सेलिबब्रेटींनी चक्क गाढवावर बसुन त्या सोहळ्यामध्ये इंट्री घेतली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनाही त्यांच्या अशा इंट्रीनं मोठा धक्काच बसला आहे. अर्थात ते दोन्ही सेलिब्रेटी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण होस्टिंगसाठी ओळखले जातात. तेव्हा त्या सोहळ्याचे होस्टिंग करत असताना त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शाहिद कपूर आणि फरहानच्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्या व्हिडिओमध्ये शाहिद कपूर म्हणतो, जे सेलिब्रेटी नेहमी हमर बाईक, स्पोर्टस बाईकवरुन शो मध्ये इंट्री घेतात आज ते गाढवावरुन शो मध्ये आले आहेत.

शाहिद कपूर नंतर फरहाननं देखील त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. फरहान म्हणतो, तसं पाहिलं तर गाढवं देखील काहीसा वेगळ्या प्रकारे विचार करत असतील. त्यामुळे आपण त्यांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. हा फनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यात शाहिद आणि फरहानच्या फॅन्सनं त्यांच्या अशाप्रकारच्या हटक्या इंट्रीचं कौतुक केलं आहे.

Shahid Kapoor and Farhan Akhtar

आयफा पुरस्कार 2022 चे आयोजन हे अबु धाबीच्या यस आयलंडमध्ये करण्यात आलं होतं. त्याला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. तीन ते चार जुन दरम्यान या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलीवूड सेलिब्रेटींनी दिमाखदार परफॉर्मन्स सादर करुन उपस्थितांची मनं जिंकली होती. सध्या आयफा 2022 चे वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Kumar : एका क्षणात सगळं बदललं… अक्षय कुमारच्या वाहनाचा भीषण अपघात, रिक्षाचालक मृत्यूशी झुंजतोय, कसा घडला अपघात? Video पाहा

BMC महापौरपदासाठी आरक्षणाच्या सोडतीची चक्राकार पद्धत भाजप-शिवसेनेच्या अडचणीची, फक्त ठाकरेंकडेच 'ते' नगरसेवक

RCB Playoffs: सलग पाच विजयांसह स्मृती मानधनाचा संघ प्लेऑफमध्ये; मुंबई इंडियन्सला किती चान्स? दोन संघांची कडवी टक्कर

Karnataka Panchayat Elections : ग्राम, तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका एकाचवेळी होणार; पंचायत राज व्यवस्थेत घडणार ऐतिहासिक बदल

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर १०२ लोकल फेऱ्या आज रद्द

SCROLL FOR NEXT