IIFA 2022 Vicky Kaushal got married once again video gone viral on the social media watch  Google
मनोरंजन

IIFA 2022:विकी कौशलनं पुन्हा केलं लग्न?; वरातीचा मजेदार व्हिडीओ व्हायरल

यंदाच्या दुबईत पार पडलेल्या IIFA 2022 पुरस्कार सोहळ्यात विकी कौशलला उत्कृष्ट अभिनेता पुरस्कारानं गौरविण्यात आलं.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचं लाडकं कपल म्हणून कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) नेहमीच चर्चेत पहायला मिळतात. दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांना भलतीच आवडते आणि म्हणूनच तर त्यांच्या प्रत्येक फोटोवर,व्हिडीओवर लाइक देताना,प्रेमाचा वर्षाव करताना नेटकरीही आपल्याला दिसतात. त्यांचा कोणताही फोटो,व्हिडीओ सेकंदात व्हायरल होतो. सध्या दुबईत पार पडलेला यंदाचा आयफा २०२२(IIFA 2022) पुरस्कार सोहळा हा अनेक कारणांनी गाजतोय. या सोहळ्यात विकी कौशल एकटाच पोहोचला होता. या सोहळ्यातला त्याच्या वरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ गेल्या वर्षीच लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर हा पहिलाच असा पुरस्कार सोहळा होता ज्यामध्ये विकीनं उपस्थिती दर्शवली होती. 'आयफा २०२२' मध्ये त्याच्या उपस्थितीनं आणखी रंगत आली म्हणता येईल. या पुरस्कार सोहळ्यातील समोर आलेल्या एका व्हिडीओत जेनेलिया डिसोझा,मनीष पॉल,तमन्ना भाटिया,कृति सनन अशा सगळ्या जणांनी मिळून विकी कौशलची चक्क वरात काढली,अगदी लग्नात असते नं तशीच. आणि कतरिनाच्या एका फोटोसोबत अगदी लग्नात जसे विधी पार पडतात तसेच काही विधी केले गेले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याला खूप पसंत केलं जात आहे.

IIFA 2022 मध्ये विकी कौशलला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. हा पुरस्कार स्विकारताना विकीनं त्या सगळ्यांना धन्यवाद म्हटलं ज्यांच्यामुळे तो इंडस्ट्रीत हा यशस्वी प्रवास करू शकला. यावेळी विकीनं आपल्या संभाषणात कतरिनाचा उल्लेख 'माय ब्युटिफुल वाइफ' असा केला. 'आयफा २०२२' मध्ये बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार विकीला त्याच्या 'सरदार उधम' या सिनेमासाठी मिळाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांसोबतच समिक्षकांनीही गौरवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT