Ileana Dcruz Instagram
मनोरंजन

Ileana Dcruz: 'मला वेळीच योग्य उपचार मिळाले म्हणून..', हॉस्पिटलमधून 'रुस्तम' फेम इलियानाची भावूक पोस्ट

बर्फी,रुस्तम सारख्या सिनेमातून रणबीर कपूर,अक्षय कुमारसोबत झळकलेली इलियाना डीक्रूझ गेल्या काही दिवसांपांसून इंडस्ट्रीपासून दूर आहे.

प्रणाली मोरे

Ileana Dcruz: अभिनेत्री इलियाना डिक्रूझनं आपले काही फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत जे पाहून तिचे चाहते मात्र हैराण झाले आहेत. इलियानानं फोटो शेअर करत आपल्याला बरं नसून आपण हॉस्पिटलमध्ये आहोत असं त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इलियानानं आपल्या हेल्थविषयी अपडेट दिली आहे, (Ileana Dcruz hospitalized actress treated with 3 bags iv fluids)

इलियानानं बॉलीवूडमध्ये अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. रणबीर कपूरसोबत 'बर्फी' सिनेमात काम करून अधिक चर्चेत आलेल्या इलियानानं अक्षय कुमारसोबत केलेल्या 'रुस्तम' सिनेमातून अनेकांची मनं जिंकली आहेत.

इलियानानं इन्स्टाग्रामवर सुरुवातीला दोन फोटोंचा कोलाज शेअर केला होता आणि आपण हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची बातमी शेअर केली होती. त्यानंतर तिनं एक नवा फोटो शेअर करत हेल्थ अपडेट दिली.

हेही वाचा: T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

या फोटोत इलियाना नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे. तिच्याकडे पाहून स्पष्ट होतंय की अभिनेत्रीची तब्येत ठीक नाही. पहिल्या स्लाइडमध्ये अभिनेत्रीनं आपले दोन फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये दिसतंय की तिच्या हाताला सलायन लावलं आहे. इलियानानं लिहिलं आहे की, ''एक दिवस किती गोष्टी बदलू शकतो...'',तिनं यावेळी डॉक्टरांचे देखील आभार मानले आहेत.

Ileana Dcruz hospitalized

पुढील स्लाइडमध्ये इलियानानं आपली सेल्फी शेअर करत लिहिलं आहे की- ''जे लोक माझी तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी मला मेसेज करत आहेत...त्यांची मी आभारी आहे. चाहत्यांच्या या प्रेमानं मी भारावले आहे,स्वतःला यासाठी मी भाग्यशाली समजते. मी आता पूर्णपणे ठीक आहे. वेळेत चांगले डॉक्टर भेटले आणि योग्य उपचार मिळाले म्हणून मी यातून बाहेर पडू शकले''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT