टीव्ही सीरियल 'इमली'चा मुख्य अभिनेता करण वोहरा याचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे त्याला कारणही तसचं काहीस आहे. करण आणि त्याची पत्नी बेला वोहरा हे जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत.
बेला आणि मुले दोघेही तंदुरुस्त असल्याची माहिती खुद्द करणनेच त्याच्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना दिली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर त्याचे चाहतेही खुपच आनंदित आहे.
करण वोहराने अतिशय खास पद्धतीने ही घोषणा केली. त्याने टी-शर्टवर इट्स ट्विन बॉयज असे लिहून पोस्ट शेअर केली आणि आपला आनंदही व्यक्त केला.
त्याने एका इंस्टाग्राम स्टोरीवर आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या पत्नीचा हात धरलेला दिसत आहे. या फोटोसोबत अभिनेत्याने लिहिले- "आजचा दिवस. ओम नमः शिवाय."
करणने पत्नी सोबत बेबी शॉवरचे फोटो शेयर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली. या चित्रात अर्धा केक गुलाबी आणि अर्धा केक निळा दिसत होता.
एका आठवड्यापूर्वी करणने पत्नीच्या बेबी बंपचा फोटोही शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते- लवकरच येत आहे. या दिवसापासून लोकांनी दोघांचंही अभिनंदन करायला सुरुवात केली.
करण वोहराची पत्नी दिल्लीत आहे. प्रसूतीनंतर दोन महिन्यांनी करण पत्नी आणि मुलांना घेऊन मुंबईला जाणार आहे. खास गोष्ट म्हणजे 11 वर्षांनंतर करणच्या घरी हा आनंदाचा क्षण आला आहे.
आजकाल करण स्टार प्लस शो 'इमली' मध्ये अथर्वची भूमिका साकारत आहे. त्याने 'जिंदगी की मेहेक' आणि 'कृष्णा चली लंडन' सारख्या मालिकांमध्येही काम केले आहे. Ent
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.