Alia Bhatt Google
मनोरंजन

सध्यातरी माझ्याकडे 'रणबीर' विषयावर तुमच्यासाठी चांगलं उत्तर नाही...

'RRR' च्या ट्रेलर लॉंचला आलियाच्या या उत्तराने फॅन्स झाले नाराज...

प्रणाली मोरे

दिपिका पदूकोण,कतरिना कैफनंतर आता कपूर फॅमिलीचा हॅन्डसम हंक रणबीर कपूर सध्या आलिया भट्टसोबत(Alia Bhatt) रीलेशनशीपमध्ये आहे. 'ब्रम्हास्त्र' या त्यांच्या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्तानं त्यांच्यात जवळीक वाढली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. आता दोघेही लीव-इन मध्ये आहेत. इतकंच काय तर आलिया रणबीरच्या प्रत्येक कौटुंबिक सोहळ्यात त्याच्यासोबत असते. अगदी ऋषी कपूर यांच्या शेवटच्या दिवसांत तसंच निधनाच्या वेळीही ती खंबीरपणे रणबीरच्या पाठीशी उभी होती. कपूर फॅमिलीही तिला पसंद करतेय असं दिसतंय. तर दुसरीकडे रणबीरही भट्ट फॅमिलीच्या प्रत्येक कार्यक्रमात हजर राहतो. दोघे ब-याचदा सार्वजनिक ठिकाणीही एकत्र हजेरी लावतात. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार असंच चित्र निर्माण झालेलं असताना अचानक असे काय घडले की आलियानं हसत-हसत का होईना पण रणबीर वर स्पष्ट बोलण टाळलं.

त्याचं झालं असं की आपल्या आलिया भट्ट मॅडम त्यांच्या आगामी बहुचर्चित 'RRR' चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचसाठी गेल्या होत्या. बरं त्यांचा हा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. नवीन वर्षात ७ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अजय देवगण,आलिया भट्ट,ज्युनियर एनटीआर आणि राम चरण अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात दिसणार आहे. एस.एस.राजामौली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अशाच या बड्या सिनेमाच्या ट्रेलर लॉंचच्या बातमीसोबतच सध्या तिथे घडलेली एक बातमी वा-यासारखी पसरतेय. रीतीरिवाजाप्रमाणे या ट्रेलर लॉंचलाही पत्रकारांची उपस्थिती होती आणि त्यांनी नेहमीप्रमाणे आलियाला प्रश्नांच्या कात्रीत पकडण्यासाठी एक असा प्रश्न विचारला की ज्यावरनं आलिया सध्या ट्रोल होतेय. तर तिथे नेमंक घडलं काय?

तिथे उपस्थित मीडियानं आलियाला विचारलं,'तुझ्या आयुष्यात 'R' हे अक्षर खूप लकी आहे असे नाही का वाटत तुला'. तेव्हा आलिया खूप लाजली खरी, पण उत्तर द्यायला तिनं एक मोठा पॉज घेतला आणि म्हणाली,''आता मला तुम्हाला द्यायला चांगलं उत्तर सापडतं नाहीय''....आणि फक्त हिंदीमध्ये तिनं 'जी हा' असं उत्तर देऊन पुढे बोलणं टाळलं. या तिच्या लाज-या हावभावांवरनं तिला ट्रोलर्सनी खूप ट्रोल केलं. पण इथे राहून राहून प्रश्न पडतोय की इतके दिवस एकत्र राहिल्यानंतर आजही आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत असं वाटू नये. आता काय बोलायचं राव 'बडे लोग,बडी बाते'. खुलेआम फिरायचं,बिनधास्त लिवइन मध्ये रहायचं आणि नातं स्विकारताना बोलणं टाळायचं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT