inc maharashtra chief nana patole slam nana patekar for his support to bjp narendra modi  SAKAL
मनोरंजन

Nana Patole on Nana Patekar: "..त्यांना गांभीर्याने घेऊ नका", पटोलेंची 'त्या' वक्तव्यावरुन नाना पाटेकरांवर टीका

नाना पाटेकरांनी केलेल्या त्या विधानांवर नाना पटोलेंनी त्यांच्यावर टीका केलीय

Devendra Jadhav

Nana Patole on Nana Patekar: नाना पाटेकर कायम त्यांच्या विविध वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नानांच्या रोखठोक स्वभावामुळे कधी त्यांना टीका सहन करावी लागते. तर कधी त्यांचं कौतुकही होतं.

अशातच नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे अनेकजण टीका करत आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाना पाटेकरांवर टिका केलीय.

नानांची नानांवर टीका

नाना पाटेकर यांनी २०२४ ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर सध्या बरीच उलटसुलट चर्चा होतेय.

अशातच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटेकरांवर टीका करताना म्हटलंय की, "नानांचे अनेक पिक्चर फ्लॉप झाले आहेत... त्यांना फार काही गांभीर्याने घेऊ नका."

काय म्हणाले होते नाना पाटेकर?

झी बिझनेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नानांना आगामी काळातील निवडणूकांविषयी विचारण्यात आले. नाना तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष पुन्हा सत्तेवर असेल, कोण जिंकेल, या प्रश्नावर नानांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. (What Nana said about election and PM Modi?)

नाना म्हणाले, "मला वाटतं बीजेपी पुन्हा एक मोठा विजय संपादन करेल. २०२४ च्या निवडणूकीमध्ये त्यांची सरशी होईल."

बीजेपीला किती जागा मिळतील यावर नाना म्हणाले, "३७५ ते ४०० जागा बीजेपीला मिळतील. एक कारण म्हणजे आपल्याकडे बीजेपीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच दिसतील." असेही नानांनी यावेळी सांगितले.

नाना खडकवासल्यातून निवडणुक लढवणार?

नाना पाटेकर खडकवासल्यातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु आहे. कारण यापूर्वी गणपती दर्शनाला गेलेल्या अजित पवारांकडेही नाना पाटेकर यांनी खडकवासल्यातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यामुळे सूत्रांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाकडून नाना निवडणूक लढवतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. याबाबत नानांनी अधिकृत वक्तव्य केलं नसलं तरीही याची बरीच चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT