Rajinikanth Semifinal Match : - ज्या सामन्याची कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत तो सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आयसीसी वर्ल्ड कप २०२३ मधील सेमीफायनला सामना वानखेडे स्टेडिमयवर भारत आणि न्युझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. याला बॉलीवूड,टॉलीवूडमधील विविध सेलिब्रेटी हजर राहणार आहेत. त्याच चर्चा आहे ती रजनीकांत यांची आहे. हा सामना पाहण्यासाठी थलायवा मुंबईत दाखल झाले आहेत. याशिवाय रणवीर सिंग, अनुष्का, दीपिका हे देखील या सामन्याला हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Ind Vs Nz WC semi Final Rajinikanth Salman khan shah rukh khan
रजनीकांत मुंबईत दाखल...
सुपरस्टार रजनीकांत हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. यापूर्वी देखील त्यांनी विविध सामन्यांना हजेरी लावून आपले क्रिकेट प्रेम दाखवून दिले आहे. भारत आणि न्युझीलंडच्या सामन्यासाठी आता रजनीकांत हे मुंबईत दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मंगळवारी रात्री ते मुंबईत आले आहेत. सोशल मीडियावर थलायवा यांचा तो व्हिडिओ समोर आला असून यावेळी वानखेडे स्टेडियममध्ये सेलिब्रेटींची गर्दी दिसून येणार आहे.
सोशल मीडियावरील त्या व्हिडिओमध्ये रजनीकांत हे भारत विरुद्ध न्युझीलंडच्या सामन्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. यावेळी त्यांनी पापाराझ्झींसोबत बोलताना दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे. मी आता मॅच पाहण्यासाठी जाणार आहे. असेही म्हटले आहे. या सामन्यासाठी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमही उपस्थित राहणार आहे. तो दोन दिवसांपूर्वीच भारतात आला आहे.
सलमान, शाहरुख अन् आमिर खानही उपस्थित राहणार....
साऊथ इंडस्ट्रीतील सेलिब्रेटींबरोबरच बॉलीवूडमधील काही दिग्गज सेलिब्रेटी भारत विरुद्ध न्युझीलंडच्या सेमी फायनलला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या सान्याची जोरदार चर्चा आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान हे या सामन्याच्यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याही प्रेक्षकांच्या भूमिकेत असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.