Ind vs Pak news esakal
मनोरंजन

Ind vs Pak: केएल राहूल शुन्यावर बाद झाला, नेटकऱ्यांनी अथियाच्या डोळ्यात आणले पाणी!

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा नेहमीच प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय असतो. हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून त्या सामन्याकडे पाहिले जाते.

युगंधर ताजणे

Ind Vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा नेहमीच प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय असतो. हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून त्या सामन्याकडे पाहिले जाते. काल झालेल्या भारत पाकिस्तान सामन्याकडे तमाम भारतीय (K L Rahul) प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. गेल्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला असल्यानं यंदाच्या आशियाई (Asia Cup 2022) करंडकात काही करुन विजय मिळवायचाच असा इरादा भारतीय संघाचा होता. पाकिस्ताननं भारताला 148 धावांचे लक्ष्य दिले होते. भारतानं ते पूर्ण करत विजयाला गवसणी घातली होती. यासगळ्यात चर्चेत आला होता. भारतीय संघाचा बिनीचा फलंदाज केएल राहूल.

राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानं त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. बाकी (entertainment News) कोणत्या नाही पण पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात आपल्या आवडत्या खेळाडूनं मोठी कामगिरी करावी अशी अपेक्षा चाहत्यांची असते. राहुलनं चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्यानं त्यांचा राग अनावर झाला. आणि त्यांनी राहुलला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यासगळ्याचा फटका राहुलची मैत्रीण अथिया शेट्टीला बसला आहे. अनेकांनी तिला देखील ट्रोल केले आहे. कित्येकांनी ट्रोल करताना मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले आहे. राहुलचे शुन्यावर बाद होणे अथियाला रडवणारे ठरले आहे.

नेटकऱ्यांनी अथिया आणि राहुलच्या लग्नावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मीम्सनं लक्ष वेधून घेतले आहे. एका युझर्सनं अथियाला ट्रोल करताना मीम्समध्ये म्हटले आहे की, सुनील शेट्टी अथियाला उद्देशुन म्हणतो की, मुली तू खरचं राहुलशी लग्न करणार आहेस का, तेव्हा दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, राहुलचं करिअर हे अथियाच्या चित्रपटांसारखं झालं आहे. तिच्या वाट्याला काही हिट चित्रपट येईना आणि राहुलचा खराब फॉर्म काही संपेना अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

सोशल मीडियावर राहुल आणि अथिया हे नेहमीच चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहेत. त्यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी त्यांच्या मित्र परिवाराकडून आली होती. अशात राहुलनं कालच्या सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे अथियाला ट्रोल व्हावे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Nawale: निर्मला नवले यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी; जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवानंतरही संघटनेत स्थान

Uruli Kanchan Garbage: उरुळी कांचनमधील पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेजच्या प्रवेशद्वारावर कचराकुंड्यांचे साम्राज्य; विद्यार्थ्यांचे ‘कचरा स्वागत’

Marathi News Live Updates: संसदेत १२ ऑगस्टला FCRA विधेयक मांडले जाण्याची शक्यता

Pune illegal hill cutting issue: पुण्यात टेकडीफोडीला लगाम घाला; बेकायदेशीर बांधकामे थांबवा, परवानग्या रद्द करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश

Pune Civic Tenders: महापालिकेच्या रखडलेल्या शेकडो कोटींच्या निविदा दोन दिवसांत मार्गी लावा; राजकीय दबावाला बळी न पडण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश

SCROLL FOR NEXT