patriotics dilouges
patriotics dilouges 
मनोरंजन

स्वातंत्र्य दिवस विशेष: देशभक्तीचे हे जबरदस्त डायलॉग्स ऐकून अंगावर येतील शहारे

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- स्वातंत्र्य आणि देशभक्तीवर आधारित बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमे आत्तपर्यंत आले आहेत. हे सिनेमे पाहून प्रत्येक भारतीयाचे डोळे पाणवतात. बॉलीवूडच्या या सिनेमांची कथा असो किंवा मग गाणी असो ती पाहिल्यावर देशप्रेमाची झलक दिसून येते. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही तुम्हाला असे डायलॉग्स सांगणार आहोत जे मोठ्या पडद्यावर पाहून भारतीयांची मान गर्वाने वर होते. 

रंग दे बसंती

डायलॉग- कोई भी देश परफेक्ट नहीं होता| उसे परफेक्ट बनाना पडता है|

सिनेमात हा डायलॉग आर माधवनच्या तोंडून ऐकायला मिळतो. रंग दे बसंती सिनेमात आमिर खान, सिद्धार्थ, शरमन जोशी, सोहा अली खान, कुणाल कपूर आणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. ओम प्रकाश मेहरा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

चक दे इंडिया

डायलॉग- मुझे स्टेट्स के नाम ना सुनाई देते है ना दिखाई देते है| सिर्फ एक मुल्क का नाम सुनाई देता है इंडिया|

यशराज फिल्म्सचा हा सिनेमा महिला हॉकी टीमवर आधारित आहे. या सिनेमात शाहरुख खानने अनेक जबरदस्त डायलॉग्स दिले आहेत. शिमित अमीन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

बेबी

डायलॉग- रिलीजन वाला जो कॉलम होता है उसमे हम बोल्ड ऑर कॅपिटल मै इंडियन लिखते है|

देशभक्ती सिनेमांबद्दल बोलत असताना अक्षय कुमारचं नाव येणार नाही असं होऊ शकेल का? या सिनेमाचं दिग्दर्शन नीरज पांडेने केलं आहे. 

स्वदेस

डायलॉग- मै नही मानता हमारा देश दुनिया का सबसे महान देश है|

लेकिन यह जरुर मानता हू की हम मै काबिलियत है, ताकत है, अपने देश को महान बनाने की| शाहरुख खानने या सिनेमात वैज्ञानिकाची भूमिका साकरली आहे जो अमेरिकेतून त्याच्या गावात परत येतो. या सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर यांनी केलंय.

द लीजंट ऑफ भगत सिंह

डायलॉग- आप नमक का हक अदा करों मै मिट्टी का हक अदा करता हूं|

या सिनेमात अजय देवगणने भगत सिंहची भूमिका साकरली होती. अजय देवगणला त्याच्या या सिनेमातील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं होतं.

उरी- द सर्जीकल स्ट्राईक

डालयॉग- ये हिंदुस्तान अब चुप नही बैठेगा| ये नया हिंदुस्तान है| ये घर में घुसेगा भी और मारेगा भी|

सर्जीकल स्ट्राईकवर आधारित असलेला हा सिनेमा वर्षातला सगळ्यात हिट सिनेमा बनलेला. सिनेमातील हा डायलॉग परेश रावल यांनी म्हटलेला. 

केसरी

डायलॉग- आज मेरी पगडी भी केसरी और जो बहेगा मेरा लहू भी केसरी और मेरा जवाब भी केसरी

केसरी या सिनेमात अक्षय कुमारचा हा हिट डायलॉग होता. या सिनेमाची कहाणी सारागढच्या लढाईमध्ये घडलेल्या घटनांवर आधारित आहे. 

independence day 2020 top patriotic dialogues of bollywood films  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT