Independence day 2022 : mahesh tilekar said bharat mata ki jay with indian army in siachen border  sakal
मनोरंजन

पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन महेश टिळेकरांनी दिली होती 'जय हिंद'ची घोषणा..

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी जाणून घ्या मराठी दिग्दर्शकाची ही गोष्ट..

नीलेश अडसूळ

Independence day 2022 : दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर (mahesh tilekar) हे कायमच समाजातील ज्वलंत विषय आणि समस्यांवर भाष्य करत करतात. अनेकदा त्यांच्या विचारांना ट्रॉलही केले जाते. पण त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे अनेकदा बदल घडतानाही दिसून आले आहे. मग तो मनोरंजन विश्वातील कंपूशाहीचा मुद्दा असो की जुन्या अभिनेत्रींना सन्मान देण्याचा मुद्दा असो. ते नेहमीच समाज माध्यमावर सक्रिय असतात. त्यांच्या देशप्रेम हे आगळेवेगळे आहे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी त्यांनी कधी 'मराठी तारका' सारखा कार्यक्रम केला तर कधी थेट पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन 'भारत माता की जय'ची घोषणा दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी हा किस्सा जरूर वाचायला हवा..

(Independence day 2022 : mahesh tilekar said bharat mata ki jay with indian army in siachen border)

निर्माता-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी भारत पाकिस्तान बॉर्डर वर जाऊन भारतीय जवानांच्या मनोरंजनासाठी सातत्याने 'मराठी तारका' हा अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रम कोणतेही मानधन न घेता करतात. जवानांचा उत्साह आणि प्रेम पाहून महेश टिळेकर म्हणतात हीच आयुष्यातील हीच मोठी कमाई आहे.

आत्ता पर्यंत त्यांनी बारामुल्ला,उरी,कारगिल आणि साडे अठरा हजार फूट उंचीवर जिथं ऑक्सिजन कमी असतो अश्या सियाचेन येथेही हा कार्यक्रम केला असून राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत 'मराठी तारका' कार्यक्रम करण्याचा मान महेश टिळेकर यांना मिळाला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मदत निधी साठी 'मराठी तारका' कार्यक्रमाद्वारे 2 कोटी रुपये निधी उभारण्यात महेश टिळेकर यांचा मोलाचा वाटा आहे.

याच त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन महेश टीळेकर यांनी 'जय हिंद- जय भारत'ची घोषणा दिली होती. त्या अनुभवाविषयी ते म्हणाले होते, 'पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्रापासून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी आपले जवान जीवाची पर्वा न करता भारत पाकिस्तान बॉर्डर वर तैनात आहेत. बर्फात तर कधी रखरखत्या उन्हात प्रतिकूल परिस्थितीत ते शत्रूशी दोन हात करत असतात. त्यामुळे जवानांचा ताण घालवण्यासाठी विरंगुळा म्हणून मी कोणतेही मानधन न घेता अगदी प्रवास खर्चही न घेता त्यांच्यासाठी 'मराठी तारका'चा कार्यक्रम करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने जवानांशी गप्पा,संवाद साधत एक वेगळी मैफल केली जाते.'

पुढे ते म्हणतात, 'सियाचीन सारख्या ऑक्सिजन कमी असलेल्या ठिकाणी साडे सतरा हजार फूट उंचीवर जाऊन तिथे जवांनाचे मनोरंजन करणे तसे खूपच अवघड, पण हा प्रयोग आम्ही स्वीकारला आणि यशस्वी देखील केला. त्यावेळी पाकिस्तानच्या बोर्डरवर जाऊन 'भारत माता की जय' ही घोषणा देणं हे अत्यंत अभिमानास्पद आणि अविस्मरणीय अनुभव देणारं होतं. शिवाय जवनांकडून मिळालेलं प्रेम कधीही विसरता येण्यासारखं नाही.' असे टिळेकर म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Trade Ban : तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT