independence day 2023 marathi movies based on indian patriotism SAKAL
मनोरंजन

Independence Day 2023: भारतीय स्वातंत्र्यदिनी देशभक्ती जागवणारे हे मराठी सिनेमे बघितलेच पाहिजे

स्वातंत्र्यदिनानिमित्त हे काही मराठी सिनेमे तुमच्या मनात घर करतील आणि देशभक्ती जागवतील

Devendra Jadhav

आज भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन. भारतातील तमाम लोक आज भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करत आहेत. भारतातील कार्यालयं, शाळा आणि कॉलेज अशा अनेक ठिकाणी आज तिरंगा फडकावुन स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करत आहेत.

आज स्वातंत्र्यदिनानिमित्त हे काही मराठी सिनेमे तुमच्या मनात घर करतील आणि तुमच्या मनात देशभक्ती जागवतील यात शंका नाही.

(independence day 2023 marathi movies based on indian patriotism)

लोकमान्य एक युगपुरष

सुबोध भावेची प्रमुख भुमिका असलेला लोकमान्य एक युगपुरुष सिनेमा प्रचंड गाजला. आदिपुरुष सिनेमा बनवुन ज्यांनी नाराजी पत्करली अशा ओम राऊतचा हा पहिला सिनेमा.

या सिनेमात लोकमान्य टिळकांच्या जीवनांचा आणि त्यांच्या विचारांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करुन सिनेमात आपल्या देशाबद्दल प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करतो

वीर सावरकर

गायक - संगीतकार सुधीर फडके यांनी लोकांकडून मिळालेल्या देणगीतुन बनवलेला सिनेमा वीर सावरकर. २००१ मध्ये हा सिनेमा सगळीकडे रिलीज झाला. या सिनेमासाठी सुधीर फडकेंना खुप संघर्ष करावा लागला. सिनेमाच्या निर्मितीत त्यांना आर्थिक मदत भासु लागली.

त्यावेळी लोकांकडून मिळालेल्या देणगीतुन त्यांनी वीर सावरकर सिनेमाचं शुटींग पूर्ण केलं

वासुदेव बळवंत फडके

अजिंक्य देवने वासुदेव बळवंत फडके सिनेमात प्रमुख भुमिका साकारली. सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. स्वातंत्र्यासाठी मरण पत्करणाऱ्या वासुदेव बळवंत फडकेंची जीवनगाथा या सिनेमातुन दिसली. अजिंक्य देवच्या भुमिकेचं खुप कौतुक झालं. २००८ साली हा सिनेमा रिलीज झाला होता.

क्रांतीवीर राजगुरु

क्रांतीवीर राजगुरु आपल्या सर्वांना माहितच आहेत. चिन्मय मांडलेकरने सिनेमात प्रमुख भुमिका साकारली होती. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांनी देशासाठी किती त्याग केला हे आपल्या सर्वांना माहितच आहे. याच क्रांतीकारक राजगुरुंच्या आयुष्यावर आधारीत सिनेमाने सर्वांची वाहवा मिळवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France protests: नेपाळ पाठोपाठ आता फ्रान्सही पेटलं! रस्त्यावर सुरू झाली जोरदार निदर्शनं अन् जाळपोळ

Uttar Pradesh : नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर CM योगी ऍक्शन मोडवर;पोलिसांना दिले आदेश

Yogi Adityanath: ''गरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना सोडणार नाही'' जनता दरबारात मुख्यमंत्री आदित्यनाथ कडाडले

Horoscope 2025 : पितृपक्ष ठरणार 'या' 3 राशींना LUCKY ! भद्र महापुरुष योगामुळे होणार पैशांची बरसात

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुरग्रस्तांना मोठा दिलासा; ४८ मदतवाहनांना दिला हिरवा झेंडा, १० कोटींची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT