Phakat, Phakat teaser, Phakat teaser news, hemant dhome, suyog gorhe, avinash narkar SAKAL
मनोरंजन

Phakat Teaser: भारत - पाकिस्तान अन् LOC, आगळ्यावेगळ्या विषयाचा धम्माल 'फकाट'

चित्रपटाच्या नावावरूनच हा अफलातून चित्रपट असल्याचे दिसतेय

Devendra Jadhav

Phakat Teaser News: सध्या मराठी मनोरंजन विश्वात विविध विषयांवरचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. रोमँटिक, कॉमेडी अशा विविध पद्धतीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच मराठीतील नवीन सिनेमा फकाट चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. फकाट च्या निमित्ताने पुन्हा एकदा एक भन्नाट चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

(india pakistan and loc new marathi movie name phakat teaser out now starring hemant dhome, suyog gorhe, avinash narkar)

'फकाट' या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा घालायला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आहे. वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित हा सिनेमा आहे.

'फकाट'च्या निमित्ताने हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे ही जोडगोळी सातारचा सलमान नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय या चित्रपटात अविनाश नारकर, नितीश चव्हाण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाच्या नावावरूनच हा अफलातून चित्रपट असल्याचे दिसतेय. टीझरच्या सुरुवातीलाच आतंकवादी आणि सैनिकांची चकमक, अंगावर शहारे आणणारा गोळीबाराचा आवाज आणि या दरम्यान एक हायली कॉन्फिडेन्शिअल माहिती असणारी एल. ओ. सी. फाईल उघडताना दिसत असून, यात सैनिकाच्या वेशात नितीश चव्हाण दिसत आहे.

एका बाजूला असे संवेदनशील चित्र दिसत असतानाच दुसऱ्या बाजूला हेमंत ढोमे (सलीम) आणि सुयोग गोऱ्हे (राजू) या जिगरी दोस्तांची धमाल, मस्तीही दिसत आहे. अचानक या दोघांच्या हातात ती फाईल पडते आणि त्यांच्या डोक्यात एक जबरदस्त कल्पना येते.

या स्वप्नांच्या दुनियेत जगत असतानाच त्यांच्या आयुष्यात पुढे काय काय घटना घडतात, त्यातून ते दोघे कसा मार्ग काढतात, पुढे त्या फाईलचं काय होतं? ती फाईल घेऊन ते दोघे कुठे जातात? या सगळ्या प्रश्नांचा उलगडा चित्रपट पाहिल्यावरच होणार आहे.

एका वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. फकाट निमित्ताने अविनाश नारकर अनेक वर्षांनी एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. १९ एप्रिलला हा सिनेमा संपुर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT