India Vs Aus World Cup Final 2023 King Khan Shah esakal
मनोरंजन

IND vs Aus WC Final 2023 : किंग खान लाडक्या आर्यनसोबत नरेंद्र मोदी स्टेडिमयमध्ये दाखल! शाहरुखच्या उपस्थितीनं उत्साहाला उधाण

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा फायनलचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे.

युगंधर ताजणे

India Vs Aus World Cup Final 2023 King Khan Shah : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा फायनलचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. अशातच बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी देखील आपल्या उपस्थितीनं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध न्युझीलंडच्या सेमी फायनलला मोठ्या प्रमाणात बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती. त्यात जॉन अब्राहम, माधुरी दीक्षित, शाहिद कपूर, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, सुपरस्टार रजनीकांत यांनी चाहत्यांची पसंती मिळवली होती. त्यानंतर आजच्या अंतिम सामन्याला देखील प्रसिद्ध सेलिब्रेटींनी हजेरी लावत टीम इंडियाला सपोर्ट केले आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि त्याचा मुलगा आर्यन खान हे देखील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्याला उपस्थित असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी किंग खान शाहरुख हा फायनलला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता शाहरुख, आर्यन खान, सुहाना आणि अब्राहम यांच्या स्टेडियममधील फोटोंनी चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

Shah Rukh Khan Family

वानखेडे स्टेडियमवर बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी केलेली गर्दी खूप काही सांगून जाणारे होते. यावेळी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमनं भारतीय खेळाडुंचा उत्साह वाढवला होता. त्याच्या उपस्थितीनं प्रेक्षक भारावून गेले होते. त्यानंतर आता अहमदाबादमधील स्टेडिमयवरील किंग खानच्या लूकनं प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. या वर्षात किंग खानच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.

या वर्षी शाहरुखचा पठाण, जवान चित्रपट प्रदर्शित झाला असून डिसेंबरमध्ये त्याचा डंकी नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यात तापसी पन्नु, विकी कौशल यांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT