Indian Cricketer Virat Kohli follow Indian idol 13 contestant on Instagram,also message Rishi Singh Google
मनोरंजन

Indian Idol 13: जिंकण्याआधीच स्पर्धकाचं फळफळलं नशीब, थेट विराटनं केला मेसेज अन् म्हणाला...

Indian Idol 13 हा शो जेव्हापासून सुरू झालाय अगदी तेव्हापासून अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे.

प्रणाली मोरे

Indian Idol 13: देशाचा सगळ्यात मोठा सिंगिंग रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडलकडे पाहिलं जातं. हा शो त्याच्या पहिल्या सिझनपासून चर्चेत राहिला आहे. यंदाचा १३ वा सिझनही अनेक कारणांनी चर्चेत आहे. शो मधील गायकांच्या गाण्याला जगभरातून पसंती मिळताना दिसत आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का की भारतीय क्रिकेटर विराट कोहली देखील इंडियन आयडल १३ चा स्पर्धक ऋषि सिंगचा चाहता बनला आहे. विराटला त्याचं गाणं इतकं आवडलं की त्यानं चक्क त्याला मेसेज करुन ते कळवलं.(Indian Cricketer Virat Kohli follow Indian idol 13 contestant on Instagram,also message Rishi Singh)

ऋषि सिंग ऑडिशन राऊंडपासूनच आपल्या दमदार आवाजानं आणि सुंदर गाण्यानं परिक्षकांचे मन जिंकत आलाय, अर्थात यात चाहतेही सामिल आहेत बरं का. ऋषि सिंगच्या आवाजाची जादू मात्र इतकी काम करुन गेली की चक्क भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला देखील त्याची प्रशंसा करण्यापासून राहावलं नाही.

विराट कोहलीनं इंडियन आयडल १३ चा स्पर्धक ऋषि सिंगच्या गाण्यावर भाळून त्याला इन्टग्रामवर एक पर्सनल मेसेज केला आहे. विराट कोहलीने ऋषि सिंगला इन्स्टाग्रामवर मेसेज करत लिहिलं आहे की- ''हॅलो ऋषि...कसा आहेस तू? मी नुकताच तुझा एक गातानाचा व्हिडीओ पाहिला. तु खूपच सुंदर गातोस. मला तुझी गायकी खूप आवडली. तुला खूप खूप शुभेच्छा''. विराटने पुढे लिहिलं आहे की, ''असाच गात रहा,पुढे जात रहा, देव तुझ्यासोबत असेल''.

Indian Cricketer Virat Kohli follow Indian idol 13 contestant on Instagram,also message Rishi Singh

बरं हा मेसेज सिलसिला इथेच नाही थांबला. तर कदाचित आपल्याला हे ऐकून विश्वास नाही बसणार पण खरंय हे. जो विराट कोहली जगातल्या दिग्गज खेळाडूंपैकी एक म्हणून गणला जातो. ज्याचे इन्स्टाग्रामवर २१६ मिलियन फॉलोअर्स आहेत. तो विराट कोहली इन्स्टाग्रामवर फक्त २५५ लोकांना फॉलो करतो ज्यातील एक इंडियन आयडल १३ चा हा स्पर्धक ऋषि सिंग आहे. अहो भाग्य म्हणावे नाही का.

Indian Cricketer Virat Kohli follow Indian idol 13 contestant on Instagram,also message Rishi Singh

कोणत्याही उभरत्या कलाकाराला जागतिक पातळीवरचा प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीकडून कामाची दाद मिळावी यापेक्षा दुसरा आनंद तो काय. ऋषि सिंगनं शो ची ट्रॉफी जिंकल्यासारखेच आहे की हे. विराटच्या या मेसेजमुळे फक्त ऋषि सिंग नाही तर इंडियन आयडल १३ ची संपूर्ण टीम खूश झाली आहे.

ऋषि सिंह यंदाच्या सिझनचा विनर बनेल की नाही हे येणारा काळच सांगेल. पण सध्या तो जिंकल्याहून अधिक आनंदाचा अनुभव घेत असणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT