Indian Idol Season 13 Registration, Audition, Judges, TV Premiere & More Updates nsa95 sakal
मनोरंजन

गायकांनो सज्ज व्हा.. 'या' दिवशी मुंबईत होणार 'इंडियन आयडॉल'चं ऑडिशन..

बहुचर्चित कार्यक्रम 'इंडियन आयडॉल'चे नवे पर्व लवकरच सुरू होणार आहे..

नीलेश अडसूळ

Indian Idol : भारतातील एक बहुचर्चित आणि बहूप्रतीक्षित सांगीतिक शो म्हणजे 'इंडियन आयडॉल'. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील हा शो प्रेक्षकांनी आजवर अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. या कार्यक्रमाचे 12 वे पर्व अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत. तितक्यातच एक आनंदाची बातमी चाहत्यांसाठी समोर आली आहे. इंडियन आयडॉलचे 13 वे पर्व लवकरच सुरू होणार असून तऑडिशनच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.

(Indian Idol Season 13 Registration, Audition, Judges, TV Premiere & More Updates)

इंडियन आयडॉल (Indian Idol) हा भारतीय टेलिव्हिजनवरील एक अत्यंत मानाचा समजला जाणारा रियालिटी शो आहे. 2004 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमानं गायकीतले अनेक हीरे आपल्याला दिले आहेत. नुतक्याच झालेल्या 12 व्या पर्वातील पवनदीप राजन हा तर अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आता 13 व्या पर्वाचे ऑडिशन सुरू झाले असून 24 जुलै रोजी मुंबईत होणार आहे. नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर्स अमृत शक्ती कॉम्प्लेक्स, चांदिवली फार्म रोड, ऑफ साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400072 येथे सकाळी 10.30 वाजल्यापासून ऑडिशन सुरू होतील.

जयपूर, भुवनेश्वर, गुवाहाटी, पटणा, कोलकाता, इंदूर आणि लखनौनंतर या वाहिनीने देशातील आणखी काही शहरांमध्ये ऑडिशन्स घेण्याचे योजले आहे. चंदिगड, देहरादून आणि दिल्ली जवळ राहणार्‍या तरुण, उत्साही आणि प्रतिभावान गायकांनासाठी नजीकच्या शहरांमध्ये या ऑडिशन देण्याची संधी आहे. या ऑडिशन्सबद्दल बोलताना इंडियन आयडॉल 12 चा विजेता पवनदीप राजन म्हणाला, 'मला पहिल्यापासून गायक व्हायचे होते आणि मी अगदी 2 वर्षांचा असल्यापासून तबला वाजवत होतो. इंडियन आयडॉलने माझे स्वप्न साकार केले. या शोमध्ये असताना मी खूप काही शिकलो.'

पुढे तो म्हणाला मला, 'ऑडिशन दरम्यान माझ्या आधी सवाई भट्टने ऑडिशन दिली होती. असे दर्जेदार गायक असताना मी इथवर पोहोचू शकेन असं मला वाटलंच नव्हतं. ऑडिशन फेरीपासून ते विजेता होईपर्यंत इंडियन आयडॉल या मंचाने मला नेहमीच सुखद धक्के दिले. आज मी जे काही आहे ते या मंचामुळे आहे. तुम्हीही ऑडिशन नक्की डया कारण यंदाचे दावेदार तुम्हीही असू शकता!'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gangwar : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून, गँगवारची शक्यता; मध्यरात्री पाटलाग करताना थरारक Video

Chakan Update : पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल होणार; चाकणमध्ये पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांचा इशारा

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणात; ‘कोठडीतील मृत्यूच्या संदर्भात मार्गदर्शक सूचनांसाठी शपथपत्र दाखल करा’

सर्जरी अर्धवट सोडली अन् नर्ससोबत संबंध ठेवण्यासाठी गेला पाकिस्तानी डॉक्टर, दुसऱ्या नर्सनं आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन्...

३०० वर्षानंतर मानवी शरीरात आढळला नवा अवयव, कॅन्सर उपचारात होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT