alibag natya spardha result esakal news
alibag natya spardha result esakal news 
मनोरंजन

राज्यस्तरीय नाटय स्पर्धा पारितोषिक वितरण यंदा अलिबागला

सकाळ डिजिटल टीम

अलिबाग: शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 56 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा भाग म्हणून राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग येथे दिनांक  21 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित  करण्यात आला आहे. या समारंभात राज्य नाटय स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

या पारितोषिक वितरण समारंभास केंद्रीय मंत्री अनंत गिते, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष उर्फ पंडितशेट पाटील आणि अलिबाग शहराचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक विशेष उपस्थिती म्हणून लाभणार आहे.  

मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि व्यावसायिक या नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या कलाकारांना नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते प्रमाणपत्र, ¸रौप्यपदक, धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. त्याचप्रमाणे उत्कृष्ट नेपथ्य,  रंग भूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, दिग्दर्शन आणि रौप्यपदके यावेळी वितरित करण्यात येतील.

पारितोषिक वितरण समारंभादरम्यान नाटय रंगोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन प्रमोद पवार यांनी केली असून लेखन योगेश सबनीस यांचे आहे. या कार्यक्रमात पूर्वा पवार, भरत सावले, पूर्णिमा अहिरे, हेमंत भालेकर, शिवाजी रेडेकर, प्रणव रावराणे, संपदा माने, अमोल बावडेकर व  लावणीसम्राज्ञी प्रमिला लोदगेकर आणि देवदत्त नागे तसेच ज.एस.एम. आणि पी.एन.पी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लोकनृत्य यांचा या कार्यक्रमात समावेश आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT