International Womens Day Women's Day Special Esakal
मनोरंजन

Women's Day Special: बॉलिवुडच्या 'या' क्वीन ज्यांनी इंडस्ट्री गाजवली..

सकाळ डिजिटल टीम

आज सर्वत्र महिला दिनानिमत्त महिला शक्तीचा जागर होत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान आणि महत्त्व आहे आणि काही काळापासून ते वेगाने वाढले आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. हे युग स्त्रियांचे आहे असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

बॉलिवूडला घडवण्यात महिलांचेही तितकेच योगदान आहे. एक काळ असा होता की चित्रपटांमध्ये फक्त पुरुषच महिलांच्या भूमिका करत असत. महिला मोठ्या पडद्यावर अभिनय क्षेत्रात नव्हत्या. मात्र आता फक्त बॉलिवुडच नव्हे तर सर्वच मनोरंजन विश्वात महिला अभिनेत्रींचा बोलबाल आहे.

2023 च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, आपण इंडस्ट्रीतील अशा 5 पहिल्या महिलांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी सर्व रूढीवाद मोडून काढला आणि येणाऱ्या पिढ्यांना नवी दिशा दिली.

देविका राणी (द फर्स्ट लेडी):

देविका राणी (द फर्स्ट लेडी): देविका राणी हे चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे आणि इंडस्ट्रीमध्ये त्यांनी प्रथमच अनेक गोष्टी अनेक बदल त्यांनी केले. त्यांना इंडस्ट्रीची फर्स्ट लेडी म्हटले जाते. याशिवाय पडद्यावर पहिल्यांदा किसिंग सीन देणारी त्या अभिनेत्री होती. देविका राणी या दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या अभिनेत्री होत्या. 30-40 च्या दशकात त्यांनी काम केले आणि खूप आदर मिळवला.

सरस्वती देवी (पहल्या म्यूजिक डायरेक्टर):

सरस्वती देवी (पहल्या म्यूजिक डायरेक्टर): तुम्ही अनेक यशस्वी पुरुष संगीत दिग्दर्शकांचे नाव ऐकले असेल, पण तुम्ही कधी महिला संगीत दिग्दर्शकाचे नाव ऐकले आहे का? पण सरस्वती देवी यांना बॉलिवूडच्या पहिल्या संगीतकार म्हटलं जातं. अलीकडे त्यांनी हे काम केलेलं नाही. 9 दशकांपूर्वी त्यांनी बॉलिवूडला संगीत दिले. त्यांची कारकीर्द 1935 ते 1949 पर्यंत चालली आणि या दरम्यान त्यांनी सुमारे 20 चित्रपटांना संगीत दिले.

सरोज मोहिनी नय्यर (पहिल्या महिला गीतकार):

सरोज मोहिनी नय्यर (पहिल्या महिला गीतकार): इंडस्ट्रीमध्ये फार कमी महिला गीतकार आहेत आणि सरोज मोहिनी नय्यर त्यामध्ये पहिल्या आहेत. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ओपी नय्यर यांच्या त्या पत्नी होत्या. Mr. & Mrs.55 या चित्रपटात त्यांनी 'प्रीतम आं मिलो' हे गाणे लिहिले होते. हे गाणे गीता दत्त यांनी गायले होते आणि नंतर गुलजार साहेबांनी देवेन वर्मा यांच्यावर चित्रीत झालेल्या अंगूर या चित्रपटातही ते गाणे समाविष्ट केले होते.

सरोज खान (पहिल्या कोरिओग्राफर):

सरोज खान (पहिल्या कोरिओग्राफर): एक चित्रपट भन्नाट गाणं आणि डान्स शिवाय अपुर्णच आहे. मग नृत्य शिकल्याशिवाय ते उत्तमरित्या सादर कसं होणार. सरोज खान या इंडस्ट्रीतील पहिल्या महिला कोरिओग्राफर होत्या. ज्यानी आपल्या प्रतिभेने अनेक विक्रम केले. रिपोर्ट्सनुसार, सरोज खानने त्याच्या दीर्घ कारकिर्दीत 3000 हून अधिक गाणी कोरिओग्राफ केली आणि अनेक स्टार्सची कारकीर्द घडवली.

टुनटुन (पहिल्या कॉमेडियन):

टुनटुन (पहिल्या कॉमेडियन): जरा त्या काळचा विचार करा जेव्हा लोक पडद्यावर स्त्रीला पाहून नाराज व्हायचे आणि पडद्यामागे राहायला भाग पाडायचे. त्या काळात टुनटूनने केवळ चित्रपटातच काम केले नाही तर लोकांचे भरपूर मनोरंजनही केले. त्यांचे योगदान आजही सर्वांना स्मरणात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आशियाई विजेत्या भारतीय तिरंदाजांची अवहेलना; १० तास विमानतळावर अडकले; अस्वच्छ धर्मशाळेत वास्तव्य...

Grain Scam:'शासकीय धान्याचा ८७ लाखांचा अपहार'; फलटण तालुक्यातील धक्कादायक प्रकार, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ..

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

SCROLL FOR NEXT