ruturaj gaikwad, sayali sanjeev Instagram
मनोरंजन

IPL 2021: कामगिरी CSKच्या ऋतुराजची, शुभेच्छा मात्र सायलीला

सायलीच्या फोटोवरील ऋतुराजच्या कमेंटची नेटकऱ्यांना आठवण

स्वाती वेमूल

सायलीच्या फोटोवरील ऋतुराजच्या कमेंटची नेटकऱ्यांना आठवण

दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएल IPL 2021 स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. रविवारच्या सामन्यात पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने १७२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड Ruturaj Gaikwad आणि रॉबिन उथप्पा यांची अर्धशतके आणि महत्त्वाच्या क्षणी धोनीने केलेली फटकेबाजी याच्या जोरावर CSK ने विजय मिळवला. ऋतुराजने ७० धावा काढल्या आणि त्याच्या याच कामगिरीवर चाहते खूश झाले. मात्र त्याच्या या कामगिरीबद्दल नेटकऱ्यांनी अभिनेत्री सायली संजीवला Sayali Sanjeev शुभेच्छा दिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी ऋतुराजने सायलीच्या एका फोटोवर कमेंट केली होती. त्या कमेंटने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. ऋतुराज आणि सायली यांच्यामध्ये नक्की काहीतरी शिजतंय, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. त्यामुळे आता ऋतुराजच्या चांगल्या कामगिरीवर नेटकऱ्यांनी सायलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी ऋतुराजचा उल्लेख केला. काहींनी तर ऋतुराजला टॅग करत कमेंट्स केल्या आहेत. 'आज तुमचे हे चांगले खेळले', 'ऋतुराज नाम तो सुना होगा' अशा कमेंट्स ऋतुराजच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

सायलीच्या फोटोशूटवर ऋतुराजने केली होती कमेंट

सायलीने सेटवरील फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले होते. यामध्ये तिने राखाडी रंगाचा पोलका डॉट डिझाइनचा हाय स्लीट वन पीस परिधान केला होता. वन आणि त्यावर पांढरे शूज असा तिचा कूल लूक होता. याच फोटोवर ऋतुराजने 'Woahh' अशी कमेंट करत हृदयाचा इमोजी पोस्ट केला होता. ऋतुराजच्या या कमेंटवर सायलीनेही हृदयाचे इमोजी पोस्ट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT