Ira Khan marriage  esakal
मनोरंजन

Ira Khan Wedding: आमिरच्या लेकीच्या लग्नाची तयारी सुरु! आयराचे नुपूरसोबत 'प्री वेडिंग' फोटोशुट, चाहत्यांनी केलं तोंडभरुन कौतुक

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या लाडक्या लेकीची आयरा खानच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार सुरु झाली आहे.

युगंधर ताजणे

Ira Khan marriage : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या लाडक्या लेकीची आयरा खानच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार सुरु झाली आहे. सोशल मीडियावर त्याचे काही फोटोही समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी आमिरनं त्याच्या एका मुलाखतीमध्ये देखील त्याविषयी भाष्य केले होते. आयराच्या लग्नात आपण खूपच भावूक होऊन जाऊ. असेही आमिरनं म्हटले होते. Ira Khan Aamir Khan Daughter Wedding Nupur Shikhare

आयरा आणि तिचा होणारा पती नुपूर शिखरे यांचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. त्यावेळी केवळ निवडक पाहुण्या मंडळींच्या उपस्थितीत आमिर खानच्या लेकीचा साखरपुडा पार पडला होता. यावेळी अभिनेत्री फातिमा सना शेखची उपस्थिती चर्चेचे कारण ठरली होती. आता नुपूर आणि आयराच्या प्री वेडिंगचे फोटोही समोर आले आहेत. त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंटसही भन्नाट आहेत.

आमिरनं मुलाखतीतून आयराच्या लग्नाविषयी माहिती दिली होती. आता सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल झाले आहेत त्याची चर्चा सुरु झाली आहे. आयरानं देखील प्री वेडिंगचे काही फोटो शेयर केले आहेत. बऱ्याच दिवसांपासून आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. तेव्हापासून त्यांच्या लग्नाची चर्चा आहे.

आयरानं इंस्टावरुन जे फोटो शेयर केले आहे त्यावरुन पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. प्री वेडिंग फोटोशूट मध्ये आय़रा आणि नुपूर एकत्र आहेत. त्या फोटोमध्ये आयराचा मराठमोळा लूक दिसून येतो आहे तर नुपूरनं यलो कलरचा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. आयराच्या या प्री वेडिंग फोटोशुटप्रसंगी दोघांच्या घरचे नातेवाईक उपस्थित होते. असेही सांगितले जात आहे.

आमिरनं त्या मुलाखतीमध्ये सांगितल्यानुसार, पुढील वर्षी जानेवारीमध्ये आयरा अन् नुपूर शिखरे यांचा विवाह होणार असल्याचे म्हटले होते. ८ ते ९ जानेवारी दरम्यान लग्नसोहळा रंगणार असून तो उदयपूर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे लग्न होण्यापूर्वी आयरा अन् नुपूर कोर्ट मॅरेज करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT