Ira Khan gave a firm reply to those who trolled Nupur over her clothes in wedding SAKAL
मनोरंजन

Ira Khan Wedding: कपड्यांवरुन नुपुरला ट्रोल करणाऱ्यांना आयराने दिलं रोखठोक उत्तर, म्हणाली.. तो घोड्यावरुन

नुपुरने लग्नात काळी बनियान परिधान केल्याने त्याला ट्रोल केलं होतं

Devendra Jadhav

Ira Khan - Nupur Shikhre Wedding: आमिर खानची लेक आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपुर शिखरे यांनी नुकतंच एकमेकांशी लग्न केलं. आयरा - नुपुरच्या लग्नाच्या फोटो - व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय.

या दोघांच्या एकच चर्चा झाली ती म्हणजे नुपुरने परिधान केलेल्या ड्रेसची. नुपुर शॉर्ट्स आणि काळ्या बनियानमध्ये जॉगिंग करत लग्नाच्या मिरवणुकीसह कार्यक्रमस्थळी पोहोचला होता. त्यामुळे नुपुरची अनेकांनी मस्करी केली. आता लग्नानंतर आयराने त्याची बाजू घेत ट्रोलर्सची तोंडं बंद केली आहेत.

आयराने पती नुपूरला ट्रोल करणाऱ्यांची तोंडं केली बंद

आयराने इन्स्टा स्टोरीवर तिच्या लग्नाच्या फंक्शनमधील पती नुपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने नुपूर कार्यक्रमस्थळी जॉगिंग करताना आणि लग्नाच्या मिरवणूकीचा आणखी एक फोटोही जोडला आहे.

या फोटोवर तिने कॅप्शन लिहिलं की, "तो घोड्यावर आला नाही. तो लग्नस्थळाच्या दिशेने धावला. कारण मी त्याच्या वाटेत सुंदर पोस्टर लावले होते.”

नुपुरने अंघोळ करुन नंतर घातली शेरवानी

यापुर्वी, इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, आयरा खान तिच्या लग्नाच्या कार्यक्रमात नूपूरच्या कपड्यांबद्दल पाहुण्यांशी बोलताना दिसली होती. आयराने पाहुण्यांना नुपूरला माफ करण्यास सांगितले.

कारण नुपुर अंघोळ करून लग्नासाठी तयार व्हायला गेला. अंघोळीनंतर नुपुरने निळ्या रंगाची शेरवानी घातली होती. यानंतर नुपूर आणि आयरा यांनी संपूर्ण कुटुंबासह फोटो क्लिक केले.

उदयपूरमध्ये रिसेप्शन आणि डेस्टिनेशन वेडिंग

कुटुंबासोबत छोटेखानी लग्नसमारंभ पार पडल्यानंतर 5 जानेवारीला पुन्हा एकदा उदयपूरमध्ये नुपुर - आयराचे डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे, ज्यामध्ये नुपूर आणि आयराचे मित्र आणि कुटूंब सहभागी होणार आहेत. तर 13 जानेवारी रोजी, BKC जिओ सेंटरमध्ये दोघेही ग्रँड रिसेप्शन देणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT