Ira Khan - Nupur Shikhare Reception dharmendra photobomb shruti akshara haasan SAKAL
मनोरंजन

Ira Khan - Nupur Shikhare Reception: कमल हासनच्या लेकी फोटोशूट करत असतानाच धर्मेंद्र आले अन्... व्हिडीओ व्हायरल

आयरा - नुपुरच्या लग्नाला धर्मेंद्र येताच कमल हासनच्या लेकींनी दिली ही प्रतिक्रिया

Devendra Jadhav

Ira Khan - Nupur Shikhare Reception: आयरा खान आणि नुपुर शिखरे यांचं वेडिंग रिसेप्शन काल मुंबईत झालं. बांद्रा येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे या दोघांंचं रिसेप्शन झालं.

या रिसेप्शनला बॉलिवूडमधले अनेक तारे - तारका उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीही हजेरी लावली. धर्मेंद्र यांच्या एन्ट्रीला अशी गोष्ट घडली की जी चांगलीच व्हायरल झालीय. काय घडलंय नेमकं? वाचा पुढे.

रिसेप्शनला धर्मेंद्र यांची एन्ट्री झाली अन्...

धर्मेंद्र यांचा आयरा - नुपुरच्या वेडिंग रिसेप्शनमधला व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यावेळी कमल हासन यांच्या लेकी श्रृती - अक्षरा फोटोशूटसाठी पोज देत होत्या.

तेव्हा अचानक धर्मेंद्र रिसेप्शनला पोहोचले. यावेळी रेड कार्पेटवर श्रुती आणि अक्षरा पापाराझींसमोर फोटोशूट करत होत्या. धर्मेंद्र अचानक मध्ये येतात. हे पाहताच श्रृती - अक्षरा पटकन बाजूला होतात आणि त्या हसायला लागतात.

आयरा - नुपुरच्या रिसेप्शनमध्ये हे कलाकार सहभागी

रिपोर्ट्सनुसार, आमिर खानने आयरा आणि नुपुरच्या रिसेप्शन पार्टीसाठी 2500 पाहुण्यांना आमंत्रित केले होते. अनिल कपूर, नागा चैतन्य, बच्चन परिवार, शर्मन जोशी, फरहान अख्तर, शिबानी, कतरिना कैफ, गौहर खान, हेमा मालिनी, रेखा, रकुल प्रीत, जॅकी भगनानी, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, धर्मेंद्र, श्रुती हसन उपस्थित होते.

आयरा - नुपुरची ग्रँड रिसेप्शन पार्टी

रिसेप्शन पार्टीत आयरा खान लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. त्याचबरोबर काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये नुपूरही खूपच सुंदर दिसत होता.

आमिरची लाडकी आयरा आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारी रोजी मुंबईत एका भव्य विवाह सोहळ्याचे आयोजन करून लग्नाची नोंदणी केली होती.

यानंतर उदयपूरमध्ये तीन दिवसीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर बुधवारी या जोडप्याचे उदयपूरमध्ये 'व्हाइट वेडिंग' झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित आर्याने १७ मुलांना जमवलं कसं? गोळी झाडली की नाही? एन्काउंटरबाबत मोठे अपडेट समोर

Belagav Black Day : काळा दिनानिमित्त बेळगावात आज निषेध फेरी; कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदीच्या नोटिसा

Latest Marathi News Live Update : मराठी भाषकांवर अन्याय, बेळगाव सीमाभागात आज काळा दिन पाळला जाणार

MNS and MVA Morcha in Mumbai : निवडणूक आयोगाविरोधात आज 'मनसे'सह ‘मविआ’चा मुंबईत निघणार ‘सत्याचा मोर्चा’

‘HSRP’ नंबरप्लेट नंबर नसल्यास होणार ‘इतका’ दंड! पहिल्यांदा १००० रुपये, त्यानंतर प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड; सोलापूर जिल्ह्यात ७,२६,९१८ वाहनांना जुनीच नंबरप्लेट

SCROLL FOR NEXT