ira khan - nupur shikhare wedding reception salman shah rukh khan aamir khan together SAKAL
मनोरंजन

Ira Khan - Nupur Shikhare Reception: आयराच्या रिसेप्शनला शाहरुख-आमिर-सलमान एकत्र, व्हिडीओ व्हायरल

शाहरुख -आमिर-सलमान आयराच्या रिसेप्शनला एकत्र आले आहेत

Devendra Jadhav

Ira Khan - Nupur Shikhare Reception News: आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाचं वेडिंग रिसेप्शन काल मुंबईत पार पडलं.

१३ जानेवारी रोजी आयरा - नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, कतरिना कैफ आणि इतर अनेक बॉलीवूड स्टार्स उपस्थित होते.

वेडिंग रिसेप्शनचा कार्यक्रम नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर, मुंबई येथे झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहरुख - सलमान - आमिर एकत्र आले.

रिसेप्शनमध्ये शाहरुख - सलमान - आमिरसोबत एकत्र

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 13 जानेवारीला त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन केले. या स्टार-स्टर्ड इव्हेंटमध्ये शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, कतरिना कैफ आणि इतरांसह अनेक बॉलिवूड ए-लिस्टर्सची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात शाहरुख पत्नी गौरी खानसोबत उपस्थित होता. याशिवाय सलमान सुद्धा उपस्थित झाला. या तीनही खानला एकत्र बघून सर्वांना आनंद झाला.

भाईजान सलमान खानची उपस्थिती

सलमान खान सुद्धा आमिरच्या मुलीच्या रिसेप्शनला उपस्थित होता. काळ्या सूटमध्ये अभिनेता स्टायलिश दिसत होता. काळ्या सुटला मॅचिंग बेल्ट अशा साध्या तरीही आकर्षक पोशाखात सलमान खान उपस्थित होता.

आयरा - नुपूरच्या रिसेप्शनबद्दल अधिक माहिती

आयरा खानने 3 जानेवारी तिचा बॉयफ्रेंड जोडीदार नुपूर शिखरेसोबत रजिस्टर मॅरेज केलं. हे लग्न ताज लँड्स एंड येथे झाला. या लग्नाला या दोघांचं कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. नंतर, या जोडप्याने 10 जानेवारी रोजी उदयपूर येथील ताज अरावेली येथे ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.

तर काल रात्री वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) स्थळी नुपूर - आयराच्या रिसेप्शनला 2500 हून अधिक पाहुणे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT