Aamir Khan Daughter Ira Pre Wedding Functions Esakal
मनोरंजन

Ira Khan-Nupur Shikhare: आमिर खानच्या लाडक्या लेकीचं महाराष्ट्रीयन 'केळवण'! इरा आणि नुपूरच्या लग्नसराईला सुरुवात

Aamir Khan Daughter Ira Pre Wedding Functions: आमिर खानची मुलगी इरा खान तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत जानेवारी 2024 मध्ये लग्न करणार आहे.

Vaishali Patil

Aamir Khan Daughter Ira Pre Wedding Functions: आमिर खानची मुलगी इरा खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या वक्तव्याबद्दल तर कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. मात्र सध्या इरा तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. इराने 18 नोव्हेंबर 2022 रोजी तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली.

इरा खान लवकरच नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. जानेवारीत हे दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहे. तर आता दोघांच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरु झाले आहे.

नुकतच इरा खान आणि नुपूरच्या लग्नाच्या कार्यक्रमांची सुरुवात केळवण सोहळ्याने झाली आहे. इरा आणि नुपूरच्या केळवणचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

नुपूरच्या फॅमिलीने इरासाठी खास केळवण सोहळ्याचे आयोजन केले होते. नुपूर - इरा हे दोघे सध्या केळवणाचा आनंद घेत आहेत. यावेळी इरा महाराष्ट्रीय लूकमध्ये दिसली, यावेळी इराने गुलाबी-पांढरी लहरिया साडी नेसली होती.

तर नुपुरने कुर्ता पिरधान केला होता. इराने नाकात नथ आणि पांरपारिक लूक केला होता. यावेळी इराने खास मराठीत उखाणा घेतला.

दोघांचा जोडा अगदी शोभुन दिसत होता. त्यांच्यासोबत इरा आणि नुपूरचे नातेवाईक दिसले. रीना दत्ता नुपूरची आई प्रीतम शिखरेसोबत दिसली होती. इराची जवळची मैत्रीण अभिनेत्री मिथिला पालकरही तिच्यासोबत दिसली.

मिडिया रिपोर्टनुसार, इरा आणि नुपूर 3 जानेवारी 2024 रोजी कोर्ट मॅरेज करणार आहेत. यानंतर ते उदयपूरला डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. त्यानंतर आमिर खान 13 जानेवारीला मुंबईत आपल्या मुलीच्या लग्नाचे भव्य रिसेप्शन देणार आहेत. आता केळवणानंतर दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असल्याचे दिसतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT