Bipasha Basu with husband Karan Singh Grover Instagram
मनोरंजन

'प्रेग्नेंट आहेस,मग पोट का लपवतेयस?' बिपाशावर प्रश्नांचा भडिमार

बिपाशा बासू लवकरच बॉलीवूडमध्ये कमबॅ्क करणार होती,पण आता प्रेगनेन्सीमुळे त्याला ब्रेक लागणार अशी चर्चा रंगलीय.

प्रणाली मोरे

बॉलीवूड(Bollywood) अभिनेत्री बिपाशा बासू(Bipasha Basu) लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं याविषयी सांगितलं होतं. पण आता तिच्याविषयी एक नवीनच बातमी समोर येतेय, ज्यामुळे तिच्या बॉलीवूड कमबॅकवर ब्रेक लागण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. ती बातमी आहे बिपाशाच्या प्रेगनन्सीची. बिपाशा बासुने २०१६ मध्ये करण सिंग ग्रोव्हरशी लग्न केलं होतं. त्यानंतर तिच्या चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती तिच्या गूड न्यूज ची. पण अद्याप तरी यावर बिपाशाकडून काहीच बोललं गेलं नाही.

पण आता पुन्हा तिच्या प्रेगनन्सीच्या बातमीनं जोर धरला आहे. त्याचं झालं असं की,बिपाशा मंगळवारी ८ मार्च रोजी महिला दिनाचं निमित्त साधत आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेली होती. तेव्हा अर्थातच ती मीडियाच्या कॅमेऱ्याच्या नजरेत आली. तिचा कुटुंबासोबतचा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला अन् बिपाशा प्रेग्नंट आहे या चर्चेला उधाण आलं.

comment box image-fan's talking about bipasha's pregnancy

या व्हिडीओत करणने ब्लॅक कलरचा टी-शर्ट आणि ग्रे कलरची जीन्सची पॅंट घातली आहे तर बिपाशानं ब्ल्यू कलरचा वन पीस घातलेला दिसत आहे. तिचा हा वन पीस ओव्हर साइज आहे. ज्यामध्ये बिपाशा खूप वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला पाहून बिपाशाच्या चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज लावताना तिला थेट 'प्रेग्नंट आहेस का?' हा सवाल केलाय. एका चाहत्यानं लिहिलंय,''बिपाशा प्रेग्नेंट आहे. ओव्हरसाइज्ड ड्रेसमध्ये होणारी आई खुपच सुंदर दिसतेय''. तर दुसऱ्या एका चाहतीनं लिहिलंय,''बिपाशा खरंच प्रेग्नेंट आहे,हे कळतंय''. तर आणखी एका चाहतीनं चक्क लिहिलंय,''बिपाशा खूप दिवसांपासून ओव्हसाइज्ड ड्रेस घालतेय, ती प्रेग्नेंट असल्यामुळे अशी फॅशन फॉलो करतेय. बेबी टमी दिसू नये म्हणून ती असे ड्रेस घालतेय. पण आम्हाला खूप आनंद झाला आहे''.

तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या प्रेगनेन्सी(Pregnancy) बातमीला जोरदार व्हायरल केलंय. बिपाशानं या नवीन वर्षात खरं तर बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याचं जाहीर केलं होतं. पण आता जर तिच्या प्रेगनेन्सी संदर्भात लावला गेलेला अंदाज जर खरा असेल तर मात्र तीचं हे कमबॅक थांबेल का? यावरही वेगळी चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT