Sunny and Vicky Kaushal Instagram
मनोरंजन

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात विकी कौशलच्या भावाला करतेय डेट?

अभिनेत्रीने अखेर सोडलं मौन

स्वाती वेमूल

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ. या नवविवाहित जोडीच्या प्रेमकहाणीविषयी चाहत्यांना उत्सुकता असतानाच आता विकीचा भाऊ सनी कौशलच्या (Sunny Kaushal) अफेअरच्याही चर्चा रंगल्या आहेत. सनीचं नाव बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) हिच्याशी जोडलं जात आहे. शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. शर्वरी आणि सनी कौशल यांनी 'द फरगॉटन आर्मी' या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा होत आहे. इतकंच नव्हे तर विकी-कतरिनाच्या लग्नाला हजेरी लावणाऱ्या काही मोजक्या खास पाहुण्यांमध्ये शर्वरीचाही समावेश होता. या चर्चांवर शर्वरीने नुकतंच मौन सोडलं आहे.

'इंडिया डॉटकॉम'ला दिलेल्या मुलाखतीत शर्वरी म्हणाली, "मी आणि सनीने 'द फरगॉटन आर्मी'मध्ये एकत्र काम केलंय. चार वर्षांपूर्वी आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. सीरिजचं शूटिंग संपल्यानंतरही आम्ही मित्र म्हणून एकमेकांच्या संपर्कात होतो. त्यामुळे मैत्रीपलीकडे आमच्यात काही नाही. माझ्या आणि सनीविषयी होणाऱ्या चर्चा या केवळ अफवा आहेत. जेव्हा तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र असता, तेव्हा ती मैत्री तुम्ही लपवू शकत नाही. आमच्या अफेअरविषयी जरी चर्चा होत असल्या तरी आमच्या मैत्रीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. आपण जगणं तर सोडू शकत नाही ना? इंडस्ट्रीमध्ये असे काही माझे मित्र आहेत, ज्यांच्यासाठी मी नेहमीच उभी असेन."

कतरिना कैफच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील फोटोंमध्ये शर्वरीला पाहिलं गेलं. गेल्या महिन्यात तिने 'बंटी और बबली २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने 'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत भूमिका साकारली होती. यामध्ये सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्याही मुख्य भूमिका होत्या. मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तर 'शिद्दत' या चित्रपटातील सनी कौशलच्या अभिनयाचं फार कौतुक झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT