Meenal Shah 
मनोरंजन

बिग बॉस मराठी ३: मीनल शाह ठरली ग्रँड फिनालेमध्ये जाणारी पहिली स्पर्धक?

घरात रंगणार शेवटचं कॅप्टन्सी कार्य 'जो जिता वही सिकंदर'

स्वाती वेमूल

बिग बॉस मराठी ३च्या (Bigg Boss Marathi 3) घरामध्ये शेवटचं कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. जो जिता वही सिकंदर असं या टास्कचं नाव आहे. घरातील पात्र सदस्यांसोबतच अपात्र सदस्यांनादेखील उमेदावरी मिळत असल्याचं बिग बॉसने गुरुवारी जाहीर केलं. त्यामुळे शेवटचं कॅप्टनपद कोणाला मिळणार आणि कोण बिग बॉसच्या घराचा शेवटचा कॅप्टन बनणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यातच आता मीनल शाहने (Meenal Shah) बाजी मारली असून बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये जाणारी ती पहिली स्पर्धक ठरल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर मीनल टास्कमध्ये जिंकल्याचा फोटो व्हायरल होत आहे. अनेकांनी तिला शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. मात्र नेमकं काय घडलंय, हे प्रेक्षकांना शुक्रवारचा एपिसोड पाहिल्यानंतरच समजेल. (Bigg Boss Marathi 3 Grand Finale)

टास्क म्हटलं तर राडा, वादावादी होणारच. जय विरुद्ध विशाल तर गायत्री विरुद्ध मीरा बघायला मिळणार आहेत. इतर सदस्य देखील एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. यामध्ये कोण विजयी ठरणार हे प्रेक्षकांना आज (शुक्रवारी) पहायला मिळेल. जेव्हापासून बिग बॉस मराठीच्या घराचं रूपांतर लिलिपुट नगरात करण्यात आलं आहे तेव्हापासून सदस्यांची झोप उडाली आहे असं म्हणायला हरकत नाही. कठीण टास्क या सदस्यांना सोपवले जात आहेत आणि त्यामुळे त्यांची तारांबळ उडतेय. फक्त टास्कच नाही तर त्यांना शिक्षादेखील भोगावी लागत आहे. गुरुवारच्या भागात उत्कर्ष आणि विशालच्या संयमाची कसोटी लागल्याचं पहायला मिळालं. तर दुसरीकडे घरात सोनाली आणि मीनलचा भन्नाट डान्स पहायला मिळाला.

बिग बॉस मराठीचा यंदाचा तिसरा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. १९ सप्टेंबर रोजी हा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'ई टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार येत्या २६ डिसेंबर रोजी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि एक स्पर्धक बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे. या शोचे निर्माते सध्या ग्रँड फिनालेसाठी जोरदार तयारी करत आहेत. या सिझनच्या ग्रँड फिनालेमध्ये प्रेक्षकांना एक छोटासा बदलसुद्धा पहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi : 'ते शरद पवार यांचे झाले नाहीत, मग जनतेचे काय होणार?' खासदार असदुद्दीन ओवैसींचा अजित पवारांवर थेट हल्ला

Flipkart Republic Day 2026 सेल या तारखेपासून होणार सुरु, आयफोनसह हे 5G फोन स्वस्तात करु शकाल खरेदी

Nanded Municipal Corporation Election : महापालिकेत यंदा कोणाला संधी? काँग्रेसला १३ वेळा महापौरपदाचा मान; शिवसेनेला एकदाच मिळाली संधी

'सुरज कुठे गेला?' बिग बॉसच्या रियुनियन पार्टीला सुरजला बोलवलं नाही? पाचही सीझनचे स्पर्धेक उपस्थित पण...

Mumbai Election Campaign : प्रचारासाठी गर्दीचा भाव वधारला! तासाभराच्या घोषणांसाठी मोजावे लागतायत १,००० रुपये!

SCROLL FOR NEXT