Is Ranbir Kapoor playing 'Ram', Alia Bhatt 'Sita', and Yash 'Raavan' in Nitesh Tiwari's Ramayan movie  SAKAL
मनोरंजन

Ramayan Movie: आता आलीया - रणबीर होणार राम - सीता, तर रावण.. नितेश तिवारीचा रामायणावर नवा सिनेमा

आमिर खानच्या दंगल सिनेमामुळे लोकप्रिय झालेला दिग्दर्शक नितेश तिवारी रामायण सिनेमा बनवत आहेत

Devendra Jadhav

Ramayan Movie Announcement News: आदिपुरुष सिनेमा आता १६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातून रामायणाची भव्य - दिव्य गाथा रुपेरी पडद्यावर आहे.

आता प्रेक्षकांना रामायण अनुभवण्याची आणखी एक संधी नवीन बॉलिवूड सिनेमातून मिळणार आहे.

आमिर खानच्या दंगल सिनेमामुळे लोकप्रिय झालेला दिग्दर्शक नितेश तिवारी रामायण सिनेमा बनवत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमाची इंटरेस्टिंग स्टारकास्ट समोर आलीय.

(Is Ranbir Kapoor playing 'Ram', Alia Bhatt 'Sita', and Yash 'Raavan' in Nitesh Tiwari's Ramayan movie)

'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, आलिया भट्ट 'रामायण'मध्ये माँ सीतेची भूमिका साकारणार आहे तर रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे.

याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाहीये. मात्र आलिया भट्टने नुकतीच नितेश तिवारी यांची भेट घेतली, ज्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. याच व्हिडिओनंतर आलियाला नितेशने सीतेच्या भूमिकेसाठी साइन केल्याची चर्चा सुरू झाली.

'रामायण' आणि त्यातील कलाकारांबद्दलच्या बातम्यांनुसार रणबीर कपूर गेल्या काही आठवड्यांपासून डीएनईजी ऑफिसमध्ये (व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अॅनिमेशन स्टुडिओ) येताना - जाताना दिसत आहे.

'रामायण' चं प्लॅनिंग कुठवर आलंय हे पाहण्यासाठी रणबीर इथे येत राहतो. ‘रामायण’ चित्रपटाचे जग कसे असावे याचे प्री-व्हिज्युअलायझेशन करण्यात आले आहे.

आता टीम भगवान रामाच्या भूमिकेसाठी रणबीरची लुक टेस्ट करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीर त्याचा परफेक्ट लूक पाहण्यासाठी स्टुडिओला वारंवार भेट देत आहे. आणि मग त्यानुसार रणबीर त्याच्या शरीरयष्टीवर काम करेल.

रिपोर्ट्सनुसार, सीतेच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित झाले आहे. तर रणबीर भगवान राम बनणार आहे. त्याची अधिकृत घोषणा यंदाच्या दिवाळीत होईल. त्याचवेळी रावणाच्या भूमिकेसाठी 'केजीएफ' स्टार यशचे नाव पुढे येत आहे.

काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की रावणाच्या भूमिकेसाठी नितेश तिवारी आणि मधु मंतेना यशसोबत चर्चा करत आहेत. यश या चित्रपटासाठी तयार असून, त्याने रावणाच्या भूमिकेत रस दाखवल्याचे बोलले जात आहे.

यशने अद्याप हा चित्रपट साईन केलेला नाही. पण यश लवकरच 'रामायण' साइन करेल असा विश्वास मधु मंतेना यांना आहे.

अल्लू अरविंद, मधु मंटेना आणि नमित मल्होत्रा ​​'रामायण'ची निर्मिती करत आहेत. तर 'दंगल' फेम नितेश तिवारी व्यतिरिक्त रवी उदयवार याचे दिग्दर्शन करणार आहेत.

हा पॅन इंडिया रामायण सिनेमा 2025 मध्ये रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आदिपुरुष नंतर प्रेक्षकांना पुन्हा एकदा रामायण सिनेमाच्या निमित्ताने ही भव्य - दिव्य गाथा रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT