Salman Khan, Katrina Kaif, Vicky Kaushal
Salman Khan, Katrina Kaif, Vicky Kaushal 
मनोरंजन

कतरिनाने सलमानला दिलं लग्नाचं आमंत्रण? बहीण अर्पिता म्हणते..

स्वाती वेमूल

अभिनेता विकी कौशल Vicky Kaushal आणि कतरिना कैफ Katrina Kaif येत्या काही दिवसांत लग्नगाठ बांधणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. या दोघांनी अद्याप अधिकृतरित्या याबद्दल कोणतीही माहिती दिली नसली तरी लग्नसोहळ्यातील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची माहिती दिवसागणिक समोर येत आहे. कतरिना-विकीने त्यांच्या लग्नाला कोणकोणत्या पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे, याविषयी अनेकांना कुतूहल आहे. विशेष म्हणजे सलमान खान Salman Khan आणि त्याच्या कुटुंबीयांना कतरिनाने आमंत्रण दिलं आहे का, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याविषयी आता सलमानची बहीण अर्पिता खानने उत्तर दिलं आहे.

सलमान आणि त्याच्या बहिणींना कतरिनाने आमंत्रण दिल्याची चर्चा होती. सलमानसोबत अर्पिता खान आणि अलविरा खान अग्निहोत्री या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र याविषयी 'इंडिया टुडे'शी बोलताना अर्पिताने सांगितलं, "आम्हाला लग्नाचं आमंत्रण मिळालेलं नाही." ९ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये विकी-कतरिना लग्नगाठ बांधणार असल्याचं कळतंय. मात्र या लग्नसोहळ्याला हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांना विकी-कतरिनाने बऱ्याच अटी घातल्या आहेत. अटींची ही यादी बरीच मोठी आहे. पाहुण्यांना काटेकोरपणे त्याचं पालन करावं लागणार आहे.

काय आहेत या अटी?

लग्नात उपस्थित असल्याचा खुलासा करू नये

लग्नसमारंभातील फोटो काढू नये

सोशल मीडियावर फोटो शेअर करू नये

सोशल मीडियावर लोकेशन शेअर करू नये

जोपर्यंत तुम्ही विवाहस्थळ सोडत नाही तोपर्यंत बाहेरील जगाशी संपर्क करू नये

लग्न नियोजकांच्या मंजुरीनंतरच सर्व फोटो प्रकाशित केले जातील

लग्नाच्या ठिकाणी कोणतेही इन्स्टा रील किंवा व्हिडिओ बनवता येणार नाहीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT