Urvashi Rautela Troll dhanashree verma esakal
मनोरंजन

Urvashi Rautela Troll: युजवेंद्र चहलच्या पत्नीनं उर्वशीला डिवचलं!

धनश्री वर्माही पोहचली ऑस्ट्रेलियाला...

सकाळ डिजिटल टीम

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गेला आणि त्याच्यांपेक्षा जास्त उर्वशी रौतेला चर्चेत आली. तिचं तडकाफडकी ऑस्ट्रेलियाला जाणं हे तिला चांगलच महागात पडलं आणि नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलं. ती ऋषभ पंतच्या मागेमागे गेल्याचा म्हणत तिच्यावर चांगलेच ताशेरे उडविले गेले. यात आता उरली सुरली कसर आता चहलच्या बायकोने पुर्ण केली आहे.

क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या नवऱ्याला प्रोत्सहित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. मात्र, धनश्रीने फोटो शेअर केलेला फोटो आणि लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. तिने या फोटोला कॅप्शन देत लिहिलंय की, "माझे हृदय खरोखरच मला ऑस्ट्रेलियात घेऊन आले. मला माझ्या मॅनसाठी तिथे जावे लागले."

तर उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही दिवसांनआधी फोटो शेअर करत लिहिले की, "तुमच्या हृदयाला फॉलो करत आहे... यामुळे मला ऑस्ट्रेलियात आणले आहे." धनश्रीसारखा हॅशटॅगही तिने वापरला होता. त्यामुळे धनश्री उर्वशीला रोस्ट करतेय का?असा सवाल नेटकरी विचारु लागले आहे.

 धनश्रीच्या या पोस्टवरुन आता नेटकऱ्यांना उर्वशीची आठवन आली आहे. तिच्या पोस्टला चांगल्याच प्रतिक्रिया येत आहेत. पहिली कमेंट युझवेंद्रनेच केली. त्याने हृदयाचे इमोजी पोस्ट केले. त्यात नेटकरी कुठे मागे राहणार त्यांनीही भरभरुन कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘तू उर्वशीची मस्करी करत आहेस, हम्म.’ दुसर्‍याने लिहिले, "हे कॅप्शन आधी कुठेतरी वाचले आहे." तर एकानं लिहिलंय, ‘मॅडम मिस वर्ल्डची कॉपी करु नका’. तिच्या ही पोस्ट आणि फोटो उर्वशीच्या पोस्टशी मिळते जुळते असल्याने तिच्या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT