Isha Ambani Twins 1st Birthday: Esakal
मनोरंजन

Isha Ambani Twins 1st Birthday: ईशा अंबानीच्या मुलांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन! कलाकारांनी लावली हजेरी

Isha Ambani Twins 1st Birthday: ईशा अंबानीची जुळी मुले कृष्णा आणि आदियाचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

Vaishali Patil

Isha Ambani Twins 1st Birthday: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने 19 नोव्हेंबर रोजी कृष्णा आणि आदिया यांचा पहिला वाढदिवस साजरा केला. सध्या सोशल मिडियावर या दोघांच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. कृष्णा आणि आदियाच्या पहिल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन खुपच जंगी करण्यात आले होते.

यावेळी भव्य पार्टी देण्यात आली होती ज्यात अनेक बॉलिवूड कलाकरांनी हजेरी लावली. या खास सोहळ्यासाठी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, कतरिना कैफ, अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर, कियारा अडवाणी यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थीत होते.

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांनी कृष्णा आणि आदिया यांच्या पहिल्या वाढदिवसासाठी भव्य पार्टी आयोजित केली होती. वाढदिवसानिमित्त अंबानी कुटुंबात मोठा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कृष्णा आणि आदियाचे आजी-आजोबा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी या भव्य वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते.

या आनंदाच्या प्रसंगी मुकेश अंबानी यांची सून श्लोका मेहताही मुलांसोबत दिसली. यावेळी पृथ्वी आणि वेद यांनी ट्यूनिंग केले होते. दोघेही मॅचिंग आउटफिटमध्ये दोघेही खूप क्यूट दिसत होते.

या खास बर्थडे पार्टीत फिल्म स्टार्ससोबतच क्रिकेटरही सहभागी झाले होते. यावेळी करण जोहर रुही आणि यशसोबत दिसला तर हार्दिक पांड्या देखील त्याचा मुलगा अगस्त्य आणि पत्नी नताशासह उपस्थित होता.

यावेळी सलमानची बहिण अर्पिता खान देखील आपल्या दोन मुलांसह पार्टीत सहभागी झाली होती. सध्या या बर्थडे पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT