ishaan khatter mystery girl revealed actor date malaysian model chandni bainz report viral vnp98 Esakal
मनोरंजन

Ishaan Khattar: अनन्या सोडल्यानंतर ईशान 'अन्य' कुणाच्या प्रेमात? टीव्ही अभिनेत्रीला करतोय डेट

Vaishali Patil

Ishaan Khatter Movie Date With Mystery Girl: ईशान खट्टरला बॉलिवूडमधला चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. तो त्याच्या चित्रपटापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याने जान्हवी कपुरसोबत धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे कमाल करु शकलेले नाहीत. तो आजही हिट चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे. ईशान खट्टर हा बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेला डेट करत होता. काही काळानंतर त्याच्यात मतभेद झाले आणि त्याचा ब्रेकअप झाला.

आता अनन्या ही आदित्य रॉय कपुरला डेट करत असल्याच्या चर्चा आहे तर दुसरीकडे ईशानचं नाव देखील एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. अनन्यापासून वेगळे झाल्यानंतर तो एका मलेशियन मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहे.

त्याच झालं की, काही दिवसांपुर्वी ईशानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात ईशान एका मुलीसोबत दिसला होता. त्यामुळे त्याच्या डेटिंगच्या अफवा पुन्हा वाऱ्यासारख्या पसरल्या. तर आता ती मुलगी कोण याचा खुलासा झाला आहे. ती मुलगी मलेशियन मॉडेल आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिचे नाव चांदनी बेंज असे आहे.

मीडिया रिपोर्टनुसार ईशान हा चांदनी बेंजला डेट करत आहे. ETimes दिलेल्या वृत्तनुसार, "दोघेही एकमेकांना डेट करत आहे. त्याने चांदनीची त्याच्या जवळच्या मित्रांसोबत ओळख करून दिली आहे. दोघांनी जून 2023 मध्ये डेट करायला सुरुवात केली."

चांदनी बेंजबद्दल बोलायचं झाल्यास ती मलेशियातील क्वालालंपूरची रहिवासी आहे. ती 'माय मदर्स स्टोरी' या टीव्ही ड्रामातून लोकप्रिय झाली. चांदनीने मलेशियन टीव्ही मालिकेतही काम केले आहे. सध्या चांदनी भारतात असून मॉडेलिंग करत आहे. ती बॉलिवूडमध्ये कामाच्या शोधात आहे.

तर ईशानने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो शेवटचा फोन भूतमध्ये दिसला होता. आता या अभिनेत्याचा पिप्पा हा देशभक्तीपर चित्रपट येणार आहे. 'पिप्पा' या वॉर ड्रामा आहे . यात तो एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ईशानची जोडी अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत आहे. यात सोनी राजदान आणि प्रियांशू पैन्युली यांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT