Janhvi Kapoor  
मनोरंजन

Photos : जान्हवी कपूरच्या बिकिनी लूकने नेटकरी घायाळ 

सकाळ ऑनलाइन

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बरीच चर्चा आहे. त्यामागचं कारणसुद्धा तसंच खास आहे. 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जान्हवीचा आतापर्यंत आपण सोज्वळ लूक पाहिला आहे. पण पहिल्यांदाच जान्हवीने तिचा बोल्ड अवतार सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या मालदीव बॉलिवूड सेलिब्रिटींचं फेव्हरेट डेस्टिनेशन बनलं आहे. तिथल्या समुद्र किनाऱ्यांवरुन हे सेलिब्रिटी वेगवेगळ्या पोझमधले फोटो पोस्ट करत असतात. आता या सेलिब्रिटींमध्ये जान्हवी कपूरचा समावेश झाला आहे. 

जान्हवीने मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरचे तिचे बिकिनी लूकमधले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंची बरीच चर्चा आहे. कारण पहिल्यांदाच जान्हवीने तिचा इतका बोल्ड, हॉट अवतार दाखवला आहे. एका ट्रॅव्हल मॅगझिनच्या कव्हर फोटोशूटसाठी जान्हवी मालदीवला गेली आहे. जान्हवीने शुक्रवारी तिच्या इन्स्टा अकाऊंटवर हिरव्या, पिवळया रंगातील फ्लोरल बिकिनीमधला एक फोटो पोस्ट केला. जान्हवीने या तिच्या सेक्सी लूकमधल्या फोटोला 'आयलँड गर्ल' असे कॅप्शन दिले आहे  

जान्हवीने मालदीव ट्रीपमध्ये तिच्यासोबत असलेल्या मुलींचाही एक फोटो पोस्ट केल्या. यात तिचे मेकअप आणि हेअर स्टायलिस्ट आहेत. जान्हवी याआधी 'रुही' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा होते. जान्हवी लकवरच 'गुड लक जेरी' चित्रपटात दिसणार आहे. सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT