Rashmika-Mandanna 
मनोरंजन

साउथच्या 'या' क्यूट अभिनेत्रीच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा!

वृत्तसंस्था

'गीता गोविंदम' या चित्रपटातून रातोरात स्टार झालेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या घरी आयकर विभागाने (इन्कम टॅक्स) छापा टाकला. रश्मिका सध्या कोडुगू जिल्ह्यातील विराज पेठ येथे राहत असून इन्कम टॅक्सच्या काही अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.17) सकाळी 7.30 च्या सुमारास तिच्या घरावर छापा टाकला. 

मिळालेल्या माहितीनुसार, इन्कम टॅक्सचे एक पथक छापा टाकण्यासाठी रश्मिकाच्या घरी पोहोचले. पथकातील दहा अधिकाऱ्यांनी तिच्या घराची झडती घेण्यास सुरवात केली. तेव्हा ती घरी नव्हती. तिचे आई-बाबाच तेवढे घरी उपस्थित होते. रश्मिका शूटिंगमुळे हैदराबादमध्ये असल्याची माहिती तिच्या मॅनेजरने अधिकाऱ्यांना दिली आहे. मात्र, इन्कम टॅक्स आणि रश्मिका यांच्याकडून याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती पुढे आली नाही. 

दरम्यान, रश्मिका ही सध्या आघाडीची साउथ इंडियन अॅक्ट्रेस असून ती सर्वाधिक मानधन घेत असल्याचेही बोलले जात आहे. 'मी या इंडस्ट्रीत आताच पाऊल ठेवले आहे. सर्वाधिक मानधन मिळण्यासाठी मला सहा-सात वर्षे अनेक हिट चित्रपट द्यावे लागतील. त्यानंतरच हे सर्व शक्य होईल. या सर्व अफवा आहेत असे रश्मिकाने स्पष्टीकरण दिले आहे.

रश्मिका कन्नड आणि तेलुगू चित्रपटांत झळकली असून 'किरिक पार्टी' या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर 'अर्जुन रेड्डी' फेम अभिनेता विजय देवरकोंडासोबत तिने 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड'मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. हे दोन्ही चित्रपट तिचे सर्वाधिक चर्चिले गेलेले चित्रपट ठरले आहेत. यानंतर ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

नुकताच रश्मिकाचा 'सरिलेरु निकेव्वरू' हा चित्रपट रिलिज झाला असून त्यामध्ये तिने साउथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत काम केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीने आणखी एकाने जीवन संपविले

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT