uddhav thakare, kangana ranaut, sanjay raut SAKAL
मनोरंजन

Kangana Ranaut: ते आपल्या कर्माची फळं... कंगना राणावत ठाकरे आणि राऊतांवर पुन्हा घसरली

उद्धव ठाकरे आणि कंगनाचा वाद चांगलाच रंगला होता

Devendra Jadhav

Kangana Ranaut News: कंगना राणौत ट्विटरवर कायम ऍक्टिव्ह असते. कंगनाने नुकतंच तिच्या फॅन्ससोबत #askkangana हे सेशन करत आहे. याअंतर्गत कंगना राणौत तिच्या फॅन्सच्या संपर्कात आहे. कंगनाचे फॅन्स तिला अनेक प्रश्न विचारत आहेत.

कंगना सुद्धा जमेल तितक्या सर्वांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं देत आहे. नुकतंच एका फॅनने कंगनाला ठाकरे - राऊत यांच्याविषयी एक प्रश्न विचारत आला. या प्रश्नावर कंगनाने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

(It's their karma... Kangana Ranaut falls again on uddhavThackeray and kangana Raut)

एका युजरने कंगनाला विचारलं, उद्धव और राऊत का हाल देखके कैसा लग रहा है? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना कंगना म्हणाली, दुस-याचे नशीब बघून एखाद्याने कधीही त्या गोष्टीचा आनंद घेऊ नये.

नीच, दयनीय लोकांना असे वाटते, मी त्या प्रकारची व्यक्ती नाही. मी फक्त त्यांना त्यांच्या कर्माची फळे भोगताना पाहते.. माझ्या स्वतःच्या भावनांचं मी अत्यंत जपून निरीक्षण करत असते" अशा शब्दात कंगनाने उत्तर दिलंय. अशाप्रकारे कंगना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर पुन्हा बरसली आहे.

याआधी सुद्धा उद्धव ठाकरे आणि कंगनाचा वाद चांगलाच रंगला होता. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर कंगनाने एक ट्विट केलं आहे. त्यात तिने लिहिले आहे की "वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते.

हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही"

गेल्या सहा महिन्यांपासून सत्तासंघर्ष आणि पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव यांचा वाद निवडणुक आयोगात गेला होता अनेक दिवस निकालाच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी अखेर आयोगाने निकाल दिला आहे. शेवटी शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT